Tribal Families: डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे शेत, माळरान, पडीक जमीन आणि जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. हा नैसर्गिक चारा कापून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय अनेक आदिवासी कुटुंबांसाठी सध्या उदरनिर्वाहाचा आधार ठरत आहे. चाराविक्रीतून दररोज सुमारे ३०० ते ४०० रुपये मिळत असल्याने पावसाळ्यातील रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे..डहाणू तालुक्यातून शहरांकडे मोठ्या प्रमाणात दूधपुरवठा केला जातो. गाई-म्हशींसाठी हिरव्या चाऱ्याची गरज असल्याने दूध डेअरी चालक आणि पशुपालकांकडून या चाऱ्याला मागणी असते. त्यामुळे आदिवासी कुटुंबे पहाटे जंगल, डोंगरकपारी, माळरान आणि पडीक जमिनीवर उगवलेला चारा कापून त्याचे भारे बांधतात. त्यानंतर महामार्गालगतच्या ठरावीक ठिकाणी त्याची विक्री केली जाते..Green Fodder Shortage: माळशिरसमध्ये ओल्या चाऱ्याचा तुटवडा.गजाड, मेंढवण, चारोटी, ओसरवीरा, आवढाणी तसेच तलासरी परिसरात सकाळी आणि सायंकाळी महामार्गालगत चाराविक्री करणारी कुटुंबे आणि चारा खरेदीसाठी येणारी ट्रक, ट्रॅक्टरची वाहने दिसून येतात. .Green Fodder: रब्बी हंगामातील चारा पिकांची लागवड .सध्या एका चाऱ्याच्या भारासाठी सुमारे ५० रुपये मिळतात. पूर्वी मोकळी मैदाने आणि जंगल क्षेत्र उपलब्ध होते, मात्र जमिनींच्या खरेदी-विक्रीमुळे अनेक ठिकाणी कुंपणे उभारण्यात आली असून नैसर्गिक चारा क्षेत्र कमी झाले आहे. ग्रामीण भागातील पशुधनाची संख्याही कमी झाल्याने उपलब्ध हिरवा चारा शहरांकडे सुरळीत रित्या पाठविला जातो आणि चाऱ्याचे क्षेत्र कमी असतानाही पावसाळ्यात उत्पन्न मिळवून देते..पावसाळ्यातील बहुतांश कामे आटोपली आहेत. शहरात अद्याप कामाची मागणी नसल्याने पावसाळ्यात उगवणारा ताजा हिरवा चारा विकून पोटापाण्याचा प्रश्न सोडवीत आहोत. पहाटे लवकर उठून चारा कापण्यासाठी जावे लागते. या वेळी साप-विंचवांची भीती असते; मात्र चार पैसे हातात मिळत असल्याने हे काम करावे लागते.रमेश पारधी, मजूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.