Farmers Facing Water Crisis: मॉन्सूनने राज्यभर हजेरी लावली असली तरी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी पिके करपण्याची भीती निर्माण झाली असून, दुसरीकडे डफळापूर तलावात अवघा १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने सिंचनासाठी उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे..पावसाअभावी ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला यांसारख्या नगदी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे पिकांसाठी सिंचनाची गरज वाढली असतानाच तलावातील मर्यादित पाणीसाठ्यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे..Agri Irrigation Crisis: पिके वाचवायची कशी? ‘उपसाबंदी’मुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट.कार्यकारी अभियंता अक्षय वारके यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले असून, मंडल अधिकारी हसन निडवणी यांच्या देखरेखीखाली तलावातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, इंजिने, पाइप आणि अन्य उपसा साहित्य हटविण्याची कारवाई करण्यात आली. याबाबत जत तालुक्यातील प्रकल्प लाभधारक गावांनाही सूचना देण्यात आल्या आहेत..Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक.प्रशासनाच्या आदेशानुसार, उपलब्ध पाणीसाठा प्रामुख्याने पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शेती, खासगी किंवा औद्योगिक कारणांसाठी तलावातून पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे..उपसाबंदीचे उल्लंघन करून पाणी उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना आणि वीजपुरवठा एका वर्षासाठी रद्द करण्यात येईल. तसेच उपसा साहित्य जप्त करून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिला आहे. मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करून नागरिक व शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.