Jalgaon News: खानदेशात दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे दर चार ते साडेचार हजार प्रति शेकडा असे आहेत. ज्वारीची मळणी, काढणी सुरू झाल्याने काही भागांत कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. .कोरडवाहू दादर ज्वारीच्या कडब्याचे दर अधिकचे आहेत. हा कडबा यंदा दुरापास्त आहे. चारा तापी, अनेर नदीच्या क्षेत्रात उपलब्ध आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी दिवाळीच्या काळात काळ्या कसदार जमिनीत जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत झाली होती. या क्षेत्रात पीक मळणी सुरू आहे..Dadar Jowar : दादर ज्वारीचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन.काही भागात पीक मळणीवर आले आहे. मागील वर्षीही दादर ज्वारीच्या कडब्याचे दर प्रति शेकडा चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत होते. यंदा चारापिके मुबलक असल्याने दर स्थिर आहेत..Dadar Jowar : दादर ज्वारीची आवक कमी; तरीही दर वाढेना.चाऱ्याची थेट खरेदीखानदेशात बाजार समित्या किंवा अन्य भागांत दादर ज्वारीच्या कडब्याची आवक होत नाही. खरेदीदार थेट शिवारातून कडब्याची खरेदी करतात. कडबा खरेदी करून त्याची कुट्टी केली जाते. ही कुट्टी वाहतूक करून तिचा साठा केला जातो. धुळ्यातील दुधाळ पशुपालक जळगाव, चोपडा व अन्य भागांतून चाऱ्याची खरेदी करीत आहेत..काही खरेदीदार बुलडाणा भागातही चाऱ्यासाठी जात आहे. रावेर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागातील दुधाळ पशुपालक व अन्य शेतकरी जळगाव, चोपडा, शिरपूर भागातून दादरच्या कडब्याची खरेदी करीत असल्याची स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.