Jalgaon News: खानदेशात मागील काही दिवस ढगाळ वातावरण आहे. याचा परिणाम विविध पिकांवर होत आहे. यातच सुसाट वाऱ्यामुळे उशिरा पेरणीची दादर ज्वारी कलंडली असून, पिकाचे अंशतः नुकसान झाले आहे. .खानदेशात या महिन्यात बेमोसमी पाऊस झालेला नाही. परंतु ढगाळ व पावसाळी वातावरण सकाळी असते. दुपारीही ढग आकाशात असतात. यातच सकाळी व दुपारी सुसाट वारा असतो. यात दादर ज्वारीची हानी होत आहे. दादर ज्वारीची उंची ११ ते १३ फूट एवढी असते. पिकात दाणे पक्व झाले आहेत. कणसाचे वजन आहे. यात पिकाची उंची अधिक असल्याने सुसाट वाऱ्यात पीक आडवे झाले आहे. पीक अद्याप पक्व झालेले नाही किंवा कणसे मळणीवर आलेली नाहीत..Dadar Jowar : दादर ज्वारीची आवक कमी; तरीही दर वाढेना.यामुळे ती पक्व होत असतानाच पीक कलंडल्याने कणसे पक्व होण्यास अडथळे येतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दादर ज्वारीची पेरणी खानदेशात यंदा कमी पाऊसमान राहिल्याने फारशी किंवा हवी तेवढी झालेली नाही. त्यात पीक काढणीवर येण्याची स्थिती तयार होत असतानाच सुसाट वारा सुटला आहे. रोज सकाळी एक ते दोन तास सुसाट वारा वाहतो. दुपारी वारा नसतो. यातच ज्या पिकाला सिंचन केले आहे, त्यात पीक आडवे किंवा कलंडण्याचे प्रमाण अधिक आहे..Dadar Jowar : सुसाट वाऱ्याने दादर ज्वारी आडवी.अनेक भागात कापणी व मळणीस गती अनेक भागात नोव्हेंबरमध्ये लागवडीचे किंवा पेरणी केलेले दादर ज्वारीचे पीक मळणीवर आले आहे. त्याची कापणी सुरू झाली आहे. परंतु पीक आडवे झाल्याने तिची कापणी करतानाही त्रास होत आहे. अधिकची मजुरी त्यासाठी लागत आहे. तसेच कणसे जमिनीवर लोळल्याने त्यांना माती लागून त्यांचेही अंशतः नुकसान होत आहे. काही दाणे त्यातून जमिनीवर पडत असून, उत्पादनावरही परिणाम होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दादर ज्वारीचे पीक खानदेशात जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, धुळ्यातील .शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागात आहे. पावसाळी वातावरणही सकाळी तयार होते. यात राज्यात काही भागात पाऊस व गारपीटही झाली आहे. यामुळे दादर ज्वारी उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.