Vidarbha Rain: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मोंथा’ चक्रीवादळ मंगळवारी (ता. २८) रात्री उशिरा किनाऱ्याला धडकणार असून, बुधवारी (ता. २९) त्याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या वादळाचा प्रभाव विदर्भात अधिक जाणवेल, तर राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.