Sindhudurg Rain Damage : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण आणि वैभववाडी तालुक्यात शनिवारी झालेल्या चक्रीवादळामुळे मोठी पडझड झाली. शेकडो घरांच्या छप्परांचे नुकसान झाले असून, लाखो रुपयांची हानी झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे..जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरू आहे. शनिवारी खारेपाटण, आखवणे पुनर्वसन गावठाण, मांगवली, वेंगसर, जानवली या परिसराला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. सर्वाधिक नुकसान खारेपाटण आणि आखवणे पुनर्वसन गावठाणात झाले..Avkali Nuksan: आंबा-काजू उत्पादनाला पूर्वमोसमी पावसाचा तडाखा.खारेपाटण शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांची कौले, तसेच सिमेंट पत्रे वाऱ्याने उडून गेले. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने खारेपाटणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. खारेपाटण परिसरातील ३० हून अधिक घरे आणि मालमत्तांचे नुकसान झाले आहे. आखवणे पुनर्वसन गावठाणात २५ घरांचे नुकसान झाले. याशिवाय वेंगसर, मांगवली, तिथवली परिसरात १६ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे..Pre Monsoon Rain Impact: सिंधुदुर्गला पूर्वमोसमी पावसाचा दणका.जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो मालमत्तांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार दहा लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे..गेले दोन दिवस विजेचे खांब उभे करणे, तुटलेल्या वीजवाहिन्या जोडणे आदी कामे सुरू आहेत. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तापमानात वाढ झाली असून, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.