Cyclone Ditwah: डिटवाह चक्रीवादळाने श्रीलंकेत (Sri Lanka) मोठी जीवितहानी झाली आहे. चक्रीवादळ आणि पुराशी संबंधित घटनांमधील येथील मृतांचा आकडा ३५५ वर पोहोचला आहे. तर ३६६ लोक बेपत्ता आहेत, असे अधिकृत आकडेवारीवरुन दिसून आले आहे. .श्रीलंकेतील रस्ते मोकळे करण्यासाठी आणि चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या लाखो लोकांच्या मदतीसाठी वेगाने बचावकार्य सुरु आहे. गेल्या शुक्रवारी जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह डिटवाह चक्रीवादळाने धडक दिली होती. यामुळे श्रीलंकेला गेल्या दशकातील सर्वात मोठ्या पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले. तर डोंगराळ मध्यवर्ती भागात भूस्खलन झाले आहे..Cyclone Ditvah: ‘डिटवाह’ चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्याला इशारा.गेल्या आठवड्यात विस्कळीत झालेली रेल्वे आणि विमान सेवा पुन्हा सुरू झाली आहे. पण शाळा अजूनही बंद आहेत. .Hawaman Andaj: थंडीच्या लाटेचा इशारा; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात घट .हे चक्रीवादळ श्रीलंकेपासून उत्तरेकडे सरकण्याची आणि त्यानंतर ते कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. संपूर्ण देशाला एवढ्या भीषण नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ होती. श्रीलंकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि आव्हानात्मक आपत्ती असल्याचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी रविवारी म्हटले. .या चक्रीवादळाचा प्रभाव भारतातील दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातही दिसून आला. येथेही मुसळधार पाऊस पडला असून पावसाशी संबंधित घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, असे तामिळनाडूचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री के.के.एस.एस.आर. रामचंद्रन यांनी सांगितले..तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या किनाऱ्यापासून ५० किमी (३० मैल) अंतरावर असलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता कमी (डीप डिप्रेशन) झाली आहे. ते पुढील १२ तासांत आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सोमवारी सांगण्यात आले आहे. .तामिळनाडूतील 'या' जिल्ह्यांना रेड अलर्टदरम्यान, तामिळनाडू (Tamil Nadu Rains) आणि लगतच्या किनारी भागात रविवारपासून पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून (IMD) कुड्डालोर, चेन्नई, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांत, विशेषतः नागापट्टनम, मयिलादुथुराई, तंजावर, चेंगलपट्टू आणि रानीपेट आदी जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.