डॉ. सर्फराजखान. एच. पठाण, डॉ. अंबादास मेहेत्रे Crop Care Tips: यंदा राज्यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यात (जून ते सप्टेंबर दरम्यान) सरासरीपेक्षा २६ टक्के जास्त पाऊस पडला आहे. राज्यात सरासरी ९९४.५ मि.मी पाऊस पडतो. यंदा ते प्रमाण १२५१.१ मि.मी वर पोहोचले आहे. अतिपावसाच्या स्थितीमध्ये मुळात कोरडवाहू असलेल्या शेवगा पिकांत नुकसान झाल्याचे दिसते. अशा स्थितीमध्ये पानगळ आणि बहार नियोजन करण्याविषयी माहिती घेऊ. .भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार चार महिन्यांत राज्यातील पावसाची स्थिती पुढील प्रमाणे आहे.कोकण विभाग : विभागाची सरासरी २८७०.८ मि.मी. असून, यंदा ३७१०.६ मि. मी. पाऊस पडला. सरासरीपेक्षा २९ टक्के अधिक.मध्य महाराष्ट्र : या विभागाची सरासरी ७४७.४ मि. मी. असून, यंदा १९३५.८ मि. मी. पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा ३९ टक्के अधिक.मराठवाडा : या विभागाची सरासरी ६४२.८ मि. मी. असून, यंदा ७७२.५ मि. मी. पाऊस पडला. सरासरीपेक्षा २० टक्के अधिक.विदर्भ : या विभागाची सरासरी ९३७.३ मि. मी. असून, यंदा १०९८.५ मि. मी. पाऊस पडला. सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक..Drumstick Cultivation : शेवगा लागवडीतून ग्रामविकासावर भर.या व्यतिरिक्त पुढे अजून ऑक्टोबर महिनाअखेर परतीच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीमध्ये एप्रिल ते जून महिन्यामध्ये नवीन शेवगा लागवड केलेले शेतकरी किंवा एप्रिल - मे महिन्यांत जुन्या शेवग्याची छाटणी केले शेतकऱ्यांच्या बागांमध्ये झाडांच्या फांद्या खूप उंच म्हणजेच १५ ते २० फुटांपर्यंत वाढलेल्या दिसत आहेत. मात्र जास्त पावसामुळे पानगळ व फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. केवळ शेंड्याकडेच काही पाने व थोड्याफार प्रमाणात फुले शिल्लक दिसत आहेत. अनेकांच्या बागेमध्ये शेवग्याच्या फक्त काड्या शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत काय करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांकडून सातत्याने विचारला जात आहे. कारण आहे तशा फांद्या ठेवल्या तरी पुढील परतीचा पाऊस साधारणतः ऑक्टोबरअखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि शेवग्याला खतपाणी देऊन फुलोरा घेणेही घातक ठरू शकते. कारण परतीच्या पावसात शेंड्याकडील उर्वरित पानांची व फुलांचीही गळती होईल. म्हणजेच ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे..पावसाच्या स्थितीमध्ये मुळाकडून आलेले अन्न-द्रव्ये शेंड्यापर्यंत नेली जात असल्याने झाडे व त्याच्या फांद्या आणखी उंच (२५ ते ३० फुटांपर्यंत) वाढतील. मात्र इतक्या उंचीवर फारच कमी शेंगा पोसतात. दुसरी बाब म्हणजे इतक्या उंच वाढलेल्या फांद्या नवी फुटव्यांच्या, पानांच्या किंवा शेंगांच्या वजनाने किंवा वाऱ्याच्या थोड्याशा झोतानेही मोडू शकतात. शिवाय इतक्या उंच फांद्यांवरील शेंगांची देखरेख विशेषतः फवारणी व काढणीही अवघड होते. म्हणजेच शेंगांचे उत्पादन व गुणवत्ता कमी मिळण्याचा धोका आहे..Moringa Health Benefits: आरोग्यदायी शेवगा.उपाययोजनासध्या तरी वरील सर्व अडचणीवर एकमेव उत्तम पर्याय म्हणजे शेवग्याची अर्धछाटणी.सध्याच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस नसलेल्या काळात उंच वाढलेल्या फांद्यांची अर्ध्यावर छाटणी करता येईल. झाडांची उंची देखील मर्यादित केल्यानंतर खतांची योग्य मात्रा दिल्यास फांद्यातून मजबूत फुटवे निघतील. सोबतच नवीन बहराच्या कळ्या देखील निघतील. फुलांची संख्याही जास्त मिळेल. त्याद्वारे बहराचे नियोजन करता येईल. या अर्धछाटणीमुळे जानेवारी ते जूनपर्यंत शेवग्याचे उत्पादन घेता येईल, अशी आशा आहे..काही शेतकऱ्यांचे नियोजन जानेवारी महिन्यामध्ये छाटणी करण्याचे दिसते. त्यांच्या मते जानेवारीमध्ये छाटणी केली तर मे - जूनमध्ये शेवग्याच्या शेंगा मिळतील. मात्र मे मध्ये येणाऱ्या वळवाच्या पावसामुळे संपूर्ण नियोजन कोलमडू शकते. त्यातून पूर्ण वर्ष वाया जाण्याचा धोका आहे. जानेवारी महिना हा शेवगा छाटणीची योग्य वेळ ठरणार नाही, असा माझा अंदाज आहे. मला तरी आता पाऊस थांबल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेवग्याच्या झाडाच्या अर्धछाटणीचा निर्णय फायदेशीर राहील असे वाटते.डॉ. सर्फराजखान एच. पठाण (सेवानिवृत्त प्राध्यापक), ८१४९८३५९७० कृषी विद्या विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.