Ghatghar Monsoon Update : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या घाटघर परिसरात यंदा आतापर्यंत पावसाची ४ हजार १०३ मिलिमीटर नोंद झाली आहे. भंडारदरा, नीळवंडे धरणे भरून पाणी विसर्ग सुरू आहे. २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भाग वगळता जिल्ह्यातील अन्य भागात मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. .जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, नीळवंडे धरणांचे पाणलोट क्षेत्रात यंदा महिनाभराने उशिरा पाऊस सुरू झाला. त्यानंतर मात्र सतत जोरदार पाऊस झाल्याने ११ टीएमसी क्षमतेचे भंडारदरा व साडेआठ टीएमसी क्षमतेचे नीळवंडे धरण महिनाभरापूर्वी भरले..Rainfall Update: घाटघर, रतनवाडी परिसरात जोरदार पाऊस.त्यामुळे पाणी विसर्ग सुरू आहे. हरिश्चंद्रगड परिसरात सव्वीस टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, आतापर्यंत पावणे पंचवीस टीएमसी पाणीसाठा झाला आहे. .Pune Dams Water Release: पुणे जिल्ह्यातील २३ धरणांतून विसर्ग सुरू.सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या घाटघरला यंदा आतापर्यंत विक्रमी ४ हजार १०३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. .त्या पाठोपाठ रतनवाडी येथेही सुमारे ३ हजार ७७१ मिलिमीटर, पांजरे येथे २ हजार ६४९ मिलिमीटर, भंडारदरा येथे २ हजार ३४३ मिलिमीटर, वाकी येथे १ हजार ९६० मिलिमीटर, नीळवंडे येथे ९२० मिलिमीटर, तर अकोले येथे ४४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आढळा धरण क्षेत्रातही पावसाची नोंद सुरू आहे. अजूनही पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे मुळा धरणात पाण्याची आवक वाढत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.