Solapur News: राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यावर छतावर सौरसंच बसविण्यासाठी सीएसआर (कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) फंडातून किंवा शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने तसा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कार्यवाही करावी लागणार आहे..घरकुल पूर्ण झाल्यावर लाभार्थीने विद्युतजोडणी केल्याची अधिकाऱ्यांनी खात्री करावी. त्यानंतर ‘पीएम सूर्यघर’च्या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. महावितरणमार्फत पडताळणी करून मंजुरी घ्यावी. लाभार्थीला घरकुलाच्या छतावर सौर संच बसविण्यासाठी पहिल्यांदा स्वत:चे पैसे गुंतवावे लागतील. पण, लाभार्थीकडे पैसे नसल्यास महावितरणचा पुरवठादार शासनाचे अनुदान येईपर्यंत स्वत:ची रक्कम गुंतवायला तयार आहे की नाही?, याची खात्री करावी. .CSR Fund : टोयोटाची सामाजिक जबाबदारी! शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा क्षेत्रात पुढाकार.दोघेही तयार नसल्यास लाभार्थी बॅंकेतून कर्ज घेऊ शकेल किंवा राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत स्वयंसहाय्यता गट, ग्रामसंघ किंवा प्रभाग संघातून बिनव्याजी, कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकेल. कोल्हापूर व वर्धा जिल्ह्यात असा प्रयोग करण्यात आला आहे..Heavy Rain Fund: अतिवृष्टीचा निधी रखडला.याशिवाय सीएसआर फंड किंवा इतर नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सौरसंच बसविण्यास मदत करता येईल, असेही ग्रामविकास विभागाच्या आदेशात नमूद आहे. सौर संच बसविल्यावर केंद्राच्या ३० हजार आणि राज्याच्या १५ हजार रुपयांच्या अनुदानासाठी लाभार्थी पुढील कार्यवाही करू शकणार आहे..घरकुल लाभार्थींना २.१० लाख अनुदानपंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थीस सध्या एक लाख २० हजार रुपये बांधकामासाठी मिळतात. याशिवाय ‘मनरेगा’तून घरकुल बांधकामाची ९० दिवसांची मजुरी २८ हजार ८० रुपये मिळते. स्वच्छ भारत मिशनमधून शौचालयासाठी १२ हजार रुपये दिले जातात. आता ४ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार ५० हजार रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत. त्यातील ३५ हजार रुपये बांधकामासाठी आणि १५ हजार रुपये सौर संच बसविल्यावर मिळणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.