Satara News: सातारा जिल्ह्यातील गाळप सुरू असलेल्या १७ साखर कारखान्यांपैकी सात साखर कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली आहे. रविवारअखेर १७ कारखान्यांनी एक कोटी २८ लाख ५ हजार ५६४ टन उस गाळपाद्वारे एक कोटी चार लाख नऊ हजार ३७० क्विंटल साखर निर्मिती केली असून सरासरी ९.९३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. शिल्लक उसाचे क्षेत्र बघता पुढील आठ दिवसांत सर्व कारखान्यांची हंगामाची सांगता होण्याची शक्यता आहे..जिल्ह्यातील ऊस तोड मजूर टंचाईने हंगामाची सुरवात झाली. बहुतांश कारखान्यांचे ऊस तोड मजूर कमी आल्याने ऊस तोडणीवर परिणाम झाला. काही कारखान्यांनी सुरूवातीपासून ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला. ऊसाचे क्षेत्र कमी आणि जास्त कारखान्यांची संख्या तसेच जिल्हाबाहेरील कारखान्यांनी ऊसाची पळवापळवी केली..Sugar Production: विलास साखर कारखान्यात ११,११,१११ व्या पोत्याचे पूजन.यामुळे अनेक कारखान्यांना आपले गाळपाचे उद्दीष्ट गाठता आलेले नाही. रयत, प्रतापगड, किसनवीर, श्रीराम, खंडाळा, लोकनेते बाळासाहेब देसाई व खटाव-माण या सात कारखान्यांची हंगामाची सांगता केलेली असून दहा कारखाने सुरू आहेत..Sugar Production: साखर उत्पादनाला अतिवृष्टीचा फटका.सहकारी कारखान्यांनी ४६ लाख २२ हजार ८० टन गाळपाद्वारे ५२ लाख दोन हजार ३० क्विटंल साखर निर्मिती केली असून सरासरी ११.८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर खाजगी कारखान्यांनी ५६ लाख ६३ हजार ४८४ टन उस गाळपाद्वारे ४८ लाख ४९ हजार १३० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. खासगी कारखान्यांचा सरासरी ८.६४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांची आघाडी असल्याने खासगी कारखान्यांनी गाळप जास्त करूनही साखर निर्मिती कमी झाली आहे..बिलांना उशीरऊस हंगामाचे दर लवकर निश्चित झाल्यामुळे आंदोलने झाली नाहीत. शेतकऱ्यांचा उस तुटल्यावर १४ दिवसांत खात्यावर बिल जमा करण्याची कायदेशीर जबाबदारी कारखान्यांची असते. मात्र हा नियम बहुतांश कारखान्यांनी पाळाललेला नाही. अनेक कारखान्यांची बिले एक ते दीड महिना उशीरा दिलेल्याने शेतकऱ्यांचा पीक कर्ज व इतर कर्जाच्या व्याजाचा भुर्दड शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. हंगाम संपत आल्यावर अखेरीची बिले येण्यासही उशीर होता. मात्र मार्च महिना तोंडावर आल्याने सर्व बिले वेळेत जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.