Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात आणि विभागात यंदा साखर कारखान्याचा हंगाम जोरात सुरू आहे. आतापर्यंत विभागात सुरू असलेल्या २७ साखर कारखान्यांकडून एक कोटी बारा लाख ६० हजार टन ऊस गाळपातून ९९ लाख ८५ हजार क्विटंल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळप आणि साखर उत्पादनातही नेहमीप्रमाणे खासगी साखर कारखानेच आघाडीवर आहेत..अहिल्यानगर विभागात यंदा १२ सहकारी, तर १० खासगी असे २२, तर नाशिक जिल्ह्यात सहकारी ३ आणि खासगी २ अशा एकूण २७ साखर कारखान्यांमार्फत गाळप सुरू आहे. दर दिवसाला विभागात सहकारी साखर कारखान्यांची ६२ हजार ९५० टन, तर खासगी कारखान्याची ५५ हजार ५०० टन अशी १ लाख १९ हजार ४५० टन गाळपाची क्षमता असून सध्या दररोज ७५ हजार टन ऊस गाळप होत आहे..Sugar Production: राज्यात ८० लाख टन साखर उत्पादन.आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारी कारखान्याकडून ५४ लााख ४१ हजार ८५५, खासगी कारखान्याकडून ३६ लाख ७४ हजार ५७२ असा ९१ लाख १६ हजार ४२७ टन, तर नाशिक जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांनी ३ लाख ९० हजार ६७६, तर खासगी कारखान्यांनी ४ लाख २८ हजार २१७ असा ८ लाख १८ हजार ८९३ टन गाळप झाले आहे. सहकारी कारखान्यांनी ६३ लाख ९९ हजार १०२ टन, तर खासगी कारखान्यांनी ४८ लाख ६१ हजार ७५७ १ कोटी बारा लाख ६० हजार टन गाळप झाले आहे..ऊस गाळपात (राशीन ता. कर्जत) येथील इंडिकॉन (अंबालिका) कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक १३ लाख ४२ हजार ८०५ टन ऊस गाळप करून १० लाख २८ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सहकारी साखर कारखान्यात भेंडा (ता. नेवासा) येथील मारुतराव घुले सहकारी साखर कारखान्याने ८ लाख ७४ हजार ८२० टन ऊस गाळपातून ८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे..Sugar Production: जालन्यात साखर उतारा ७.४१ टक्के.दर जाहीर नाहीचअहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर करावा यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दोन वेळा साखर कारखान्यांच्या प्रतिनिधी व प्रादेशिक सह संचालक (साखर) कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात ऊसदराबाबत साखर कारखान्यावर गंभीर आरोप करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. .मात्र त्यानंतर संघटनांचे नेतेही गप्प झाले आणि उसाचा दरही जाहीर झाला नाही. आता साखर कारखान्याचा गाळप हंगाम काही दिवसाने बंद होईल अजून त्याबाबत स्पष्ट केले जात नसले तरी साधारण महिना ते दीड महिन्यात गाळप हंगाम संपेल असे दिसते. दराबाबतचे आंदोलन शांत झाल्याने कारखान्यांनी दर वर्षीप्रमाणे आपापल्या सोयीप्रमाणे दर देऊन पैसेही वाटप केले, मात्र एखादा अपवाद वगळता अजून दर जाहीर झाला नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.