Parbhani News: करपरा नदीच्या पुराच्या पाण्यानं दरसालीच हजारो एकरांवरील खरिपाच्या सर्वच पिकांच वाटोळं व्हत. काहीच हाती लागत नाही. खर्च, मेहनत पाण्यात जात आहे. नदी पात्राचे खोलीकरण, रुंदीकरण केले तरच पुराच्या संकटातून सुटका होऊ शकेल. नाहीतर खरिपातील पिकांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल, अशा चिंता जिंतूर तालुक्यातील बोरी व दूधगाव मंडलातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली..जिंतूर तालुक्यात यंदा जून महिन्याचा अपवाद वगळता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने थैमान घातले. मॉन्सून कालावधीत (जून ते सप्टेंबर) सरासरी ७३३.४ मिमी अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात ९४३.३ मिमी (१२८.६ टक्के) पाऊस झाला. बोरी मंडलांत पाच वेळा, तर दूधगाव मंडलांत तीन वेळा अतिवृष्टी झाली. या बोरी, दूधगाव, जिंतूर या ३ मंडलांत १ हजार मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. यंदाचा हा पावसाचा उच्चांक आहे..८० टक्क्यांवर पिके उद्ध्वस्तजिंतूर तालुक्यात यंदा ९६ हजार ३७५ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयाबीन ५२ हजार ४९४ हेक्टर, कपाशी २८ हजार ९९५ हेक्टर, तूर १२ हजार ५८५ हेक्टर, मूग ७६३ हेक्टर, उडीद ६०३ हेक्टर यांचा समावेश आहे. सततच्या पावसामुळे काढणीच्या अवस्थेतील मुगाच्या शेंगांना मोड फुटले. उडीदही वाया गेले. सखल जमिनीवरील पिके पाण्यात बुडाली. नद्यांच्या पुरात पिके गाळात गाडल्या गेली. .करपरा मध्यम प्रकल्पाचा कालवा फुटल्यामुळे पिकांचे नुकसान झाले.मुसळधार पावसाच्या वेगाच्या प्रवाहामुळे धुरे, बांध फुटले. माती वाहून गेली. भिजून भिजून सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले. कापसाच्या वाती झाल्या. खरिपातील ८० टक्केवर पिकांना अतिवृष्टी, पुरामुळे तडाखा बसला आहे. वाताहात झाली. त्यात ओढे, नाले, नद्या काठच्या पिकांवर शेतकऱ्यांनी केलेला खर्च व्यर्थ केला. करपरा नदीची काठची पिके मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही समूळ उद्ध्वस्त झाली आहेत..Maharashtra Flood : नदीच्या रौद्ररूपात हरवलं शेतकऱ्यांचं जगणं.करपरा नदीचे रुंदीकरण गरजेचेनिवळी खुर्द (ता. जिंतूर) करपरा मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याच्या खालच्या भागामध्ये जमा झालेला मुरूम, खडक, गाळ जमा झाल्यामुळे पुराचे पाणी नदीकाठच्या शेतामध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान तसेच जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नदीपात्रात झाडे, झुडपे वाढली आहेत. पुरामुळे होणारे नुकसान थांबविण्यासाठी करपरा नदीचे सरळीकरण, रुंदीकरण, खोलीकरण करण्यात यावे मागणीसाठी यंदाच्या एप्रिलमध्ये शेतकऱ्यांनी नदी पात्रात आंदोलन केले होते..नदीची वहन क्षमता पुनःस्थापित करण्याकरिता करपरा नदी पात्राची ६ किलोमीटरची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व सर्वेक्षण करण्यात आले. एक किलोमीटरचे खोलीकरण काम अतिशय तातडीचे असल्याचे दिसून आले. पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे निवळी खुर्द येथील काही शेतकऱ्यांना यंदा दिलासा मिळाला. परंतु त्यापुढील रुंदीकरण, खोलीकरण करणे देखील आवश्यक आहे. निवळी बुद्रुक, कडसावंगी, चांदज, वर्णा, नागापूर, बोरी, देवगाव, मुडा, बोर्डी, डोहरा, कसर, आसेगाव, दूधगाव आदी गावांतील पिके, जमिनीचे पुरामुळे नुकसान होत आहे..पुरामुळे शेती करणे झाले अवघडबोरी येथील प्रभाकर शिंपले म्हणाले, की करपरा नदीवरील पुलाजवळ तीन एकर जमीन आहे. दरवर्षी मागील तीन वर्षांपासून काहीच येथे नाही. यंदाही लई बरसात झाली. तीन एकरांवर केलेला ३० हजार रुपये खर्च झाला. मजूर लावून कुजलेले सोयाबीन बाहेर फेकून द्यावं लागल. नागापूर येथील ज्ञानेश्वर अंभुरे म्हणाले, की बोरी शिवारात करपरा नदी काठच्या १२ एकरांवरील पिके दरवर्षीच पाण्यात बुडतात. .तीन-तीन, चार-चार दिवस पुराचे पाणी उतरत नाही. पिके मुळसगट सडून जातात. काढणी करायच कामच राहात नाही. यंदाही बारा एकरांवरील सोयाबीन पुरामध्ये बुडाले. गावाजवळ्याच्या दोन एकरांवरील कपाशीत दोन महिन्यांपासून वाफसा नाही. जमीन शेवाळली आहे. कापूस फुटला आहे. पण पाय फसत असल्यामुळे वेचणी करता येत नाही. दिगंबर अंभुरे म्हणाले, की करपरा काठच्या पाणथळ जमिनीवरील अडीच एकर सोयाबीनची वाढ झाली नाही. दोन चार शेंगा लागल्या त्यातील दाणे डागील झाले वजनाला हलके आहेत. कापणीला महाग झाले आहे. दहा एकर जमीन अडीच लाख रुपये ठोक्याने (रोख रक्कम) केली आहे..Solapur Flood : पूर ओसरताच दिसू लागले उसाचे चिपाड.पण तिथूनबी काही हाती लागणार नाही. ठोक्याची रक्कम, पेरणीसाठी मिळून चार लाख खर्च झालाय. आमदानीव व्हत नसल्यामुळे पुढच्या वर्षी ठोक्यान जमीन करण सोडून द्यायच आहे. देवगाव येथील रामदास इप्पर म्हणाले, की करपरा नदीकाठच्या साडेतीन एकरांत आमदानीच होत नाही. यंदा तीन वेळा आलेल्या पुरानं वाटोळ केल. डोहरा येथील सुरेश गाडेकर, व्यंकटराव कऱ्हाळे म्हणाले, की आमच्या गावाच्या शिवारातील ७०० ते ८०० एकरांवरील पिकांचे एका बाजूने करपरा नदीमुळे, तर दुसऱ्या बाजूने नाल्याच्या पुरामुळे खूप मोठे नुकसान होत आहे. पूरहानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात..जून ते सप्टेंबर २०२५ मंडलनिहाय पर्जन्यमान स्थिती (मिमीमध्ये)मंडल अपेक्षित पाऊस प्रत्यक्ष पाऊस टक्केवारीबोरी ७३३.४ १०८६.५ १४८.१दूधगाव ७३३.४ १०५९.८ १४४.५जिंतूर ७३३.४ ११०८.० १५१.१सावंगी म्हाळासा ७३३.४ ७९६.१ १०८.१बामणी ७३३.४ ८५८.९ ११७.१आडगाव ७३३.४ ९७०.४ १३२.३चारठाणा ७३३.४ ७८८.६ १०७.५वाघी धानोरा ७३३.४ ८७४.४ ११९.२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.