Kolhapur News : गेल्या वीस वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. वन्यप्राण्यांमुळे अनेकांनी जीव गमावला आहे, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. .यावर वन विभाग ठोस उपाययोजना करत नसल्याने शेतकरी न्याय्य हक्क संघर्ष समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पंधरा दिवसांच्या आत, म्हणजेच ५ ऑक्टोबरपर्यंत, मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्यासमवेत बैठक न झाल्यास वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे..Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक.समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांना घाबरून जंगलालगतच्या काही शेतकऱ्यांनी शेती करणेच बंद केले आहे. याबाबत वन विभगाला अनेकवेळा निवेदने दिली आहेत. मोर्चे, आंदोलने झाली, पण वन विभागाकडून मात्र ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. .यापूर्वी आजरा येथे मुख्य वनसरंक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्यासमवेत बैठका होऊन कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याचे ठरले, पण पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. या प्रश्नातील काही मुद्दे मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांच्या अधिकार कक्षेतील आहेत, तर काही मुद्दे धोरणात्मक आहेत. त्यासाठी दोन बैठका होणे आवश्यक आहे. .Wildlife Accident : वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी कुंपण व्यवस्थेचे काय? .मुख्य वनसरंक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्यासमवेत प्राथमिक बैठक होऊन मंत्रालय स्तरावरील चर्चेसाठी टिपण तयार होणे आवश्यक आहे. त्याबाबत बैठक अजून झालेली नाही. तरी याबाबत पुढाकार घेऊन याप्रश्नी सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जनतेत याबाबत तीव्र असंतोष आहे..त्यामुळे ५ ऑक्टोबरपर्यंत मुख्यवनसरंक्षक, उपवनसंरक्षक यांच्यासह आजरा येथे बैठक न झाल्यास आपल्या कार्यालयावर तालुक्यातील शेतकरी मोर्चा काढू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संपत देसाई, संजय सावंत, प्रकाश मोरुस्कर, शांताराम पाटील, दशरथ घुरे, रवींद्र भाटले, बयाजी येडगे, काशीनाथ मोरे, भीमराव माधव, नारायण भडांगे, बाळू जाधव यांच्या सह्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.