Crop Rotation Benefits: अमरावती : हवामानातील अनिश्चिततेमुळे नजीकच्या काळात तूर, हरभरा या पिकांत कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाणे प्रक्रिया त्याबरोबरच निरीक्षणवृती जपण्याची तसेच पीक फेरपालटावर भर देण्याची गरज आहे, असे मत श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. जितेंद्र दुर्गे यांनी व्यक्त केले. .‘दै. ॲग्रोवन’ तसेच आत्मा यंत्रणा अमरावती यांच्या संयुक्त सहकार्याने चांदूररेल्वे येथे ॲग्रोवन संवाद कार्यक्रम पार पडला. या वेळी हरभरा व तूर पिकातील मुख्य कीड व त्यांचे व्यवस्थापन या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. दुर्गे बोलत होते. हरीरा पिकात हेलीओकोव्हरपा ही अळी सर्वांत नुकसानकारक आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप, पक्षी थांबे, नीमअर्क तसेच जैविक कीटकनाशकांचा वापर अशा उपाययोजनांवर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे. फ्युजेरियम विल्ट या रोगावर नियंत्रणासाठी बियाणे प्रक्रिया, ट्रायकोडर्मा मिश्रणाचा वापर आणि जमिनीतील ओलावा नियमन आवश्यक आहे. तूर पिकात फुलकिडा हा सर्वांत महत्त्वाचा किटक असून त्याच्या नियंत्रणासाठी फुलाच्या अवस्थेतच नियमित पाहणीवर भर असता पाहिजे. त्यानंतर जैव नियंत्रणाच्या माध्यमातून त्यावर प्रतिबंध करता येतो. चांदूररेल्वे तालुका कृषी अधिकारी संचित ढाकरे, अमोल पेठे, जय सिद्धेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्ष साधना देशमुख, आत्मा प्रकल्पाचे दिनेश मोंडे, प्रभाग समन्वयक रेखा खेडकर यांची या वेळी उपस्थिती होती. .Crop Rotation : धानपट्ट्यात पीक फेरपालटावर भर द्या .शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य जपत आधुनिक तंत्रज्ञान आधारे शाश्वत शेतीपद्धातीचा अंगीकार करावा, असे आवाहन या वेळी श्री. दुर्गे यांनी केले. त्याबरोबर ॲग्रोवन तसेच आत्मा यंत्रणाच्या यांच्या वतीने आयोजित प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सचिन शेगोकार यांनी ॲग्रोवन संदर्भाने माहिती दिली. आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक परीक्षित मालखेडे यांनी सूत्रसंचालन केले. पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पाणलोट कार्यक्रम याविषयी त्यांनी विस्ताराने माहिती दिली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते कीड-रोग नियंत्रण विषयक पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. .Crop Rotation : पीक फेरपालटची कास धरा : ठोंबरे.समस्यांचे निराकरण ॲग्रोवन-संवाद कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात विविध पिकांतील कीड-रोग नियंत्रणासंदर्भाने शेतकऱ्यांच्या असलेल्या शंकांचे तज्ज्ञांनी समाधान केले. त्यामध्ये हरभरा, तूर या पिकांचा मुख्यत्वे समावेश होता. सेंद्रिय पीकपद्धती, निविष्ठा याबाबतही शेतकऱ्यांनी श्री. दुर्गे यांच्याकडून जाणून घेतले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.