Jalna News : मागील आठवड्यात सलग तीन दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश दिले. मात्र, जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीमध्ये २४ कोटींच्या अतिवृष्टी घोटाळा प्रकरणात २८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ओढाताण सुरू झाली आहे. तर दुसरीकडे, पीक नुकसानीच्या प्राथमिक अहवालासंदर्भात महसूल विभागाकडून टोलवाटोलवी सुरू आहे..जिल्ह्यात गत आठवड्यात जिल्ह्यातील परतूर, बदनापूर, अंबड, जालना आणि घनसावंगी तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला. या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये तळे साचले होते. त्यामुळे खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा, असे आदेश पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले होते. .Rain Crop Damage : लातूर जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त गावांतील नुकसानीची पाहणी .मात्र, जिल्ह्यात गाजत असलेल्या अतिवृष्टी घोटाळ्यामुळे महसूल विभागात पीक नुकसान अहवालासंदर्भात सर्व काही अलबेल असल्याचे चित्र आहे. महसूल विभागाकडे पीक नुकसानीचा प्राथमिक अहवालच आला नाही. पीक नुकसान अहवालासाठी महसूल विभागाकडून चक्क नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याकडे बोट दाखवले जात आहे. तर पंचनामे सुरू आहेत, परंतु एक अहवाल आलेला नाही, असे उत्तर महसूल विभागातून दिले जात आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे ओढून ताणून होणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे..एक हजार ९६१ हेक्टरवर नुकसान?मागील आठवड्यात झालेल्या पावासने बदनापूर आणि परतूर तालुक्यांत नुकसान झाल्याचा अहवाल महसूल विभागाकडे आला आहे. परंतु, ज्या अधिकाऱ्याकडे हा अहवाल आला त्याच अधिकाऱ्यावर अतिवृष्टी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे..Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात.त्यामुळे हा अहवाल त्याच्या संगणकात कैद आहे. या अहवालानुसार बदनापूर तालुक्यातील नऊ गावांमधील ३७८ शेतकऱ्यांचे ४७० हेक्टर जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, परतूर तालुक्यातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे..मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचा प्राथमिक अहवाल तयार झाला. तसेच पंचनामे सुरू आहेत. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात काही जणांवर गुन्हे दाखल झाल्याने अंबड, घनसावंगी तालुक्यांत उपलब्ध मनुष्यबळाला अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे पीक पंचनाम्यांचा अहवाल येण्यास काहीसा वेळ लागत आहे.- गणेश महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.