Agricultural Loan Approval Delays: राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बँकांकडून पीककर्ज वितरणाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात असतानाही अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळालेले नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत पीककर्ज वाटपच गर्तेत अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे..नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ जुलै २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार २९,१८६ हेक्टर क्षेत्रासाठी ४८,९६६ शेतकऱ्यांना ५२१.२८ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. हे एकूण वार्षिक उद्दिष्टाच्या केवळ २०.०३ टक्के इतकेच आहे. खरीप पेरणी मोठ्या प्रमाणात पूर्ण होत असताना कर्जवाटपाची ही टक्केवारी अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून किंवा इतर मार्गांनी भांडवल उभे करण्याची वेळ येत आहे..Crop Loan 2026: लातुरात सर्व बँकांना जुनेच पीक कर्ज उद्दिष्ट.जिल्ह्यातील बँकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ३५७.६४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित केले असून, ३६,२५७ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. या बँकेने आपल्या उद्दिष्टाच्या ६६.०९ टक्के कर्जवाटप पूर्ण केले आहे. तर व्यापारी व खासगी बँकांनी ७,५२५ शेतकऱ्यांना ११६.२६ कोटी रुपये आणि ग्रामीण बँकांनी ४,३४४ शेतकऱ्यांना ४८.०९ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे..कर्जमाफीच्या घोषणेनंतर अनेक बँकांनी जुन्या कर्जाची पडताळणी, पात्रतेची छाननी आणि नव्या कर्ज प्रस्तावांच्या मंजुरीची प्रक्रिया संथ गतीने सुरू ठेवल्याची चर्चा आहे. परिणामी, वेळेवर पीककर्ज न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीडनियंत्रणासाठी आवश्यक भांडवल उभे करण्यात अडचणी येत आहेत..Crop Loan 2026: लातुरात सर्व बँकांना जुनेच पीक कर्ज उद्दिष्ट.पेरणी पूर्ण झाल्यानंतरही पीक व्यवस्थापनासाठी आर्थिक गरज कायम असल्याने पीककर्ज वितरणाला तातडीने गती देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे..नांदेड जिल्ह्यातील पीककर्ज वाटप (ता. ६ जुलै)एकूण लाभार्थी : ४८,१६६ शेतकरीवितरित रक्कम : ५२१.९९ कोटीउद्दिष्टपूर्ती : २०.५९ टक्केजिल्हा मध्यवर्ती बँक : ३५७.६४ कोटी (३६,२५७ शेतकरी)व्यापारी, खासगी बँक : ११६.२६ कोटी (७,५२५ शेतकरी)ग्रामीण बँक : ४८.०९ कोटी (४,३९४ शेतकरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.