Crop Loan Target Amravati: खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यात पीककर्ज वाटपाला वेग आला आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील ५२ हजार १८४ शेतकऱ्यांना ७५७ कोटी १३ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले असून हे एकूण उद्दिष्टाच्या सुमारे ४६ टक्के इतके आहे. .मात्र, कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली असताना राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची कामगिरी दरवर्षीप्रमाणे सुमार असल्याचे चित्र आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार ६०० शेतकऱ्यांना १ हजार ६५० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे..Kharif Crop Loan: खरिप पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६९ कोटी ९५ लाख रुपयांची वाढ.त्यासाठी जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयीकृत बँका, ७ वाणिज्य बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत १ एप्रिलपासून कर्जवाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक आघाडी घेत ४१ हजार ६५४ शेतकऱ्यांना ५८५ कोटी ५६ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे..Crop Loan Distribution: खरिपासाठी ५१२ कोटींचे पीककर्ज वाटप.उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने या बँकेची कामगिरी ७६ टक्क्यांवर पोहोचली आहे. दुसरीकडे ग्रामीण बँकांनी ५८७ शेतकऱ्यांना सुमारे ७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी ९ हजार ९५३ शेतकऱ्यांना १५० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित केले असून त्यांची उद्दिष्टपूर्ती सुमारे २० टक्के इतकीच आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी कर्जवाटप प्रक्रियेला गती देण्याची गरज व्यक्त होत आहे..पात्र शेतकऱ्यांना पीकर्ज द्यावेखरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक पाठबळ मिळाल्यास बियाणे, खते, मशागतीची कामे आणि पेरणीची तयारी सुरळीत होणार आहे. त्यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.