Jalgaon News : खानदेशात खरिपात पीक कर्ज वाटप ९० टक्केही झाले नाही. रब्बीतही अशीच स्थिती असून, पीक कर्ज वाटपाबाबत काय लक्ष्यांक आहे, किती शेतकऱ्यांना हे कर्ज मिळेल, याबाबत लक्ष्यांक, आढावा झालेला नाही. यामुळे रब्बीतही पीक कर्ज वितरण टक्केवारी कमी राहील, असे दिसत आहे. कारण प्रशासन पुढे निवडणुकीच्या धामधुमीत असणार आहे. अनेक शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. .रब्बी पीक कर्ज वितरणासंबंधी खानदेशात मागील वेळेस सुमारे १००० कोटींचा लक्ष्यांक होता. जळगाव जिल्ह्यात सुमारे ७०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे होते. धुळे व नंदुरबारात सुमारे ३२० कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे होते. यंदाही अशीच स्थिती राहील, असे संकेत आहेत. यातच जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांना द्यायचे आहे. .Crop Loan : खरीप पीककर्जाचे ५१.८९ टक्के उद्दिष्ट साध्य.तर जिल्हा बँकेलाही पीक कर्ज वितरण लक्ष्यांक जळगावात आहे. धुळ्यात मात्र धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेला पीक कर्ज रब्बीत वितरित करायचे नाही. गेल्या वर्षीही या बँकेला लक्ष्यांक नव्हता. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खासगी बँकांना पीक कर्ज वितरण करायचे आहे. पीक कर्जासंबंधी या हंगामातही अडथळे, अडचणी शेतकऱ्यांना सतावत आहेत..Crop Loan: खरीप हंगामात केवळ ३५ टक्के पीककर्ज वाटप.त्यात कर्जासाठी कागदपत्र, सर्च रिपोर्टची जुळवाजुळव, बँकेत कमी मनुष्यबळ, अधिकाऱ्यांची रिक्त पदे अशी कारणे आहेत. जळगाव जिल्ह्यात अनेक राष्ट्रीयीकृत बँका ग्राहक किंवा शेतकऱ्यांना कर्जाबाबत सहकार्य करीत नाहीत.कर्जाचा विषय नंतर पाहू, असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जाते. यामुळे शेतकरी बँकेत खेटे घालत आहेत. दुसरीकडे प्रशासनानेदेखील याबाबत आपल्या बैठका घेणे लांबणीवर टाकले आहे. बँक अधिकारी व इतरांसोबत कर्ज वाटपाबाबत चर्चा करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधीदेखील प्रचार, संपर्क व इतर कामांत व्यस्त आहेत..खरिपात खानदेशात सुमारे चार हजार कोटी रुपये पीक कर्ज वितरण खानदेशात लक्ष्यांक होता. यातील ९० टक्केच कर्ज वितरण झाले. ऑक्टोबरपासून रब्बी हंगाम सुरू झाला आहे. पण पीक कर्जाबाबत प्रशासन, बँका यांच्यात बैठका, पुढील कार्यवाही याबाबत समन्वयाचा अभाव दिसत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत..बँकांची मनमानीपीक कर्जाचा निधी केंद्र किंवा राज्य शासन बँकांना उपलब्ध करून देत नाही. हा निधी बँका आपला नफा व इतर निधीतून उपलब्ध करतात. शेतीला कर्ज देणे अधिक जोखीमेचे बँका मानतात. यामुळे पीक कर्जाचा लक्ष्यांकच पूर्ण होत नाही. हा लक्ष्यांक शासन निश्चित करते, पण बँका १००टक्के लक्ष्यांक पूर्ण करून पीक कर्ज वितरण करीत नाहीत, असे शेतकरी व जाणकारांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.