Rabi Season: खानदेशात रब्बी पीककर्ज वितरण ७० टक्केही झाले नाही. आता खरिपासंबंधी जिल्हा बँकांचे कर्ज वाटप सुरू झालेले नाही. त्यात मार्चअखेरची वसुली जोमात सुरू आहे. .पीक कर्जमाफी झाली, पण बँकांकडे आदेश नाहीत. यामुळे कर्जमाफी योजनेची यादीही बँकांत प्रसिद्ध झालेली नाही. शेतकरी संभ्रमात आहेत. रब्बीत खानदेशात सुमारे ८०० कोटी रुपये पीककर्ज वितरित करायचे होते. रब्बी हंगाम अधिकृतपणे ऑक्टोबरमध्ये सुरू झाला. आता मार्च महिना संपत आला तरीदेखील पीककर्ज वितरणाची गती संथ आहे. दुसरीकडे कर्जवसुली गतीने सुरू आहे..Crop Loan Recovery: शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती.जळगाव जिल्ह्यात रब्बी पीककर्ज मागणी आहे, असा दावा बँका करतात. धुळे व नंदुरबारातही प्रत्येकी १०० कोटींवर पीककर्ज वितरण झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीककर्ज वाटपात आघाडीवर आहे. धुळे व नंदुरबारात मात्र जिल्हा बँकेला रब्बीकर्ज वितरण लक्ष्यांक दिलेला नाही. राष्ट्रीयीकृत बँकांकडे रब्बी पीककर्ज वितरणाची जबाबदारी आहे. यात पीककर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बँका करण्याकडे काणाडोळा करीत आहेत, परंतु कर्ज वसुली सुरू आहे, असा आरोप शेतकरी करीत आहेत..Crop Loan Recovery: ४० हजार कोटींच्या पीककर्ज वसुलीबाबत बॅंकांना साशंकता.कर्जवसुली बंदची मागणीकर्जवसुली बंद करा, कर्जमाफी करा, अशी मागणी शेतकरी सतत करीत आहेत. राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज वाटपात हात आखडता घेत आहेत. अनेक शाखांमध्ये कर्मचारीसंख्या कमी आहे. शाखाधिकारी, व्यवस्थापक नसतात, यामुळे प्रस्तावावर निर्णय होत नाही. नवे बँक खाते संबंधित बँकेत उघडले जात नसल्याची स्थिती आहे. .जळगाव जिल्ह्यात सुमारे ६०० कोटी, धुळ्यात ८० आणि नंदुरबारात ११० कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे आहे. गेल्या वर्षीदेखील पीक कर्ज फक्त ८० टक्केच वितरित झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.