Crop Loan Applications: पीककर्ज प्रस्तावांत वाढ; वितरण मात्र संथ
Loan Disbursement: खानदेशात चालू हंगामात केळीसह विविध पिकांसाठी पीक कर्जाच्या प्रस्तावांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत सुमारे पाच हजार प्रस्ताव विविध बँकांकडे सादर झाले असून, त्यासाठी अंदाजे २,९०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.