Amaravati News : नैसर्गिक आपत्तीने नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना कमी व विमा कंपनीला अधिक नफा झाला आहे. गतवर्षीच्या (२०२४) हंगामात विमा कंपनीने तब्बल ६७.८० कोटी रुपये नफा मिळवला तर शेतकऱ्यांच्या हिस्स्यावर ५०.६१ कोटी आले. सुधारित विमा योजनेतही शेतकऱ्यांना परतावा अधिक मिळण्याची शक्यता कमीच आहे. .२०२३ पासून राज्यात एक रुपयात पीकविमा योजना राबविण्यात आली. ही योजना कप अॅंड कॅप मॉडेलवर (९०. ११०) आधारित होती. अमरावती जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार ३६१ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. त्यांनी ४.७६ कोटी रुपये प्रीमिअम भरून चार लाख नऊ हजार ८५१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. राज्य व केंद्र सरकारने मिळून ३३९.४९ कोटींचा प्रीमिअम दिला होता..Crop Insurance: फळ पीकविमाधारक केळी उत्पादकांत संभ्रम.त्या वेळी नुकसानीचे सर्व ट्रिगर लागू होते. तथापि, स्थानिक नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या नुकसानात अधिक परतावे मिळत होते. या वर्षी या सबबीखाली जिल्ह्यातील एक लाख ७० हजार १५१ शेतकऱ्यांनी नुकसानाच्या पूर्वसूचना दिल्या. त्यातील २५ हजार नऊ फेटाळण्यात आल्या व एक लाख ४५ हजार १४२ शेतकऱ्यांना नुकसान परताव्यासाठी पात्र ठरविण्यात आले. यापोटी विमा कंपनीने ५०.६१ कोटी रुपयांचे परतावे दिले आहेत..Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात केवळ २३ टक्के क्षेत्र विमासंरक्षित.कप अॅंड कॅप मॉडेलनुसार कंपनीला वीस टक्के मिळाले असून त्यांच्या खात्यात ६७.८० कोटी रुपये गेलेत. या योजनेत कंपनीला शेतकऱ्यांपेक्षा १७.१९ कोटी रुपये अधिक मिळाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपनी मालामाल झाली. .सुधारित विमा योजनेत शेतकरी हिस्सा वाढला असून, नुकसानभरपाईसाठी केवळ एकच ट्रिगर लागू करण्यात आला आहे. पीक कापणी प्रयोगावर आधारित हा ट्रिगर असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परतावे मिळणे कठीण आहे. त्याच वेळी कंपनीला मात्र नफा कायम राहणार आहे.२ हजार ६१२ शेतकऱ्यांना ५७४ रुपयेविमा कंपनीला प्राप्त एकूण पूर्वसूचनेपैकी २५ हजार ९ सूचना कंपनीने फेटाळल्यात. ज्या शेतकऱ्यांना परतावे मिळाले, त्यापैकी २ हजार ६१२ शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षाही कमी परतावे मिळाले आहेत. एकूण १५ लाख रुपयांचे परतावे कंपनीने दिले. सरासरी शेतकऱ्यांना ५७४ रुपयांचा परतावा मिळाला. .२०२४ ची स्थितीसहभागी शेतकरी - २,३५,३६१संरक्षित क्षेत्र - ४,७०,४७७कंपनीला एकूण प्रीमियम - ३३९.५५नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परतावे - ५०.६१ कोटीविमा कंपनीला नफा - ६७.८० कोटी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.