Parbhani News : खरीप हंगाम-२०२५ मध्ये पीकविमा योजनेसाठी किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या तब्बल ४२ हजार ५९५ ने कमी झाली असून, फक्त २३ हजार ८९० शेतकऱ्यांनी ४३ हजार १८० अर्ज दाखल केले आहेत. .या अर्जांद्वारे ३१ हजार ४३१ हेक्टरवरील पिकांना एक अब्ज ८१ कोटी १८ लाख ४७ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या विम्यासाठी शेतकऱ्यांनी ३ कोटी २३ लाख ७६ हजार ५२० रुपयांचा हप्ता भरला आहे, तर राज्य व केंद्र शासनाचा प्रत्येकी ४ कोटी ५२ लाख ४४ हजार ४३१ रुपयांचा हिस्सा समाविष्ट असून, एकूण १२ कोटी २८ लाख ६५ हजार ३८२ रुपयांचे विमा हप्ते निश्चित झाले आहेत..Crop Insurance : सांगलीत ६३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा संरक्षित.गतवर्षी ३९ हजार २०५ शेतकऱ्यांनी ८५ हजार ७७५ अर्ज दाखल केले होते, तर २०२३ मध्ये ९३ हजार ३२६ अर्ज आले होते. त्यामुळे यंदाच्या अर्जांची संख्या जवळपास निम्म्यावर आली आहे. नांदेड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजना राबविली जात असून, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मूग या पिकांसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान विमा भरणे सुरू होते. .नंतर बिगर कर्जदारांसाठी १४ ऑगस्टपर्यंत व कर्जदारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.यंदा बंद करण्यात आलेली ‘एक रुपया विमा योजना’ आणि वाढलेला हप्ता यामुळे शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. सुधारित योजनेत खरीप पिकांसाठी संरक्षित रकमेच्या २ टक्के आणि नगदी पिकांसाठी ५ टक्के इतका हप्ता भरावा लागत आहे..Crop Insurance : निलंग्यात ७३ हजार हेक्टरला विमा संरक्षण .सोयाबीनला सर्वाधिक मागणीकिनवट तालुक्यात विमा घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये ३२ हजार २० पुरुष, ११ हजार १५१ महिला आणि इतर ९ जणांचा समावेश आहे. .पिकांसाठी घेतलेल्या एकूण विम्यामध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ६२ टक्के हिस्सा सोयाबीनसाठी असून, त्यानंतर ३३ टक्के कपाशीसाठी आहे. उर्वरित ५ टक्के अर्ज तूर, मूग, उडीद, ज्वारी व मका या पिकांसाठी दाखल झाले आहेत. यंदाच्या अर्जांची संख्या जवळपास निम्म्यावर आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.