Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात २०२४-५ मध्ये हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना परतावे वेळेत प्राप्त झाले नाहीत. हे परतावे विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत केळी विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते. परंतु परतावे न मिळाल्याने नियमानुसार विमाधारकांना १२ टक्के व्याज दिले जावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. .जिल्ह्यातील सुमारे ७२ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये विमा संरक्षण घेतले होते. हे विमा संरक्षण १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ जुलै २०२५ या नऊ महिन्यांसाठी होते. हा विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत हे परतावे पात्र विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते. परंतु परतावे कुणालाही वेळेत मिळाले नाही..Farmers Demand: हमीभावाचा कायदा त्वरित लागू करावा.तेदेखील अनेक मंडळांत कमी मिळाले. अनेकांना कमी तापमानाबाबत परतावे मिळाले नाहीत. परताव्यांना अनेक दिवसांचा विलंब झाला. वेळेत परतावे न मिळाल्यास शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजासह देणे विमा कंपनीला बंधनकारक आहेत..Farmers Demand: ‘एमएसपी’ला कायदेशीर हमी,संपूर्ण कर्जमाफीची मागणी.कंपनीने परतावे दिले, पण त्यावरील १२ टक्के व्याजाचा निधी दिला नाही. यामुळे व्याजाची रक्कम दिली जावी, अशी मागणी शेतकरी, विमाधारक करीत आहेत..पीकविमा योजना विमा कंपनीच्या फायद्यासाठीच चालविली जात आहे. ज्या वेळी शेतकऱ्यांचा लाभ होताना दिसतो, त्या वेळी नियम, कायदे, अटी विमा कंपनी व कृषी विभाग पुढे करतो. हेच नियम विमा कंपनी व शासनालाही लागू आहेत. कृषी विभागाच्या आडमुठेपणा व नसत्या बाबी उकरण्याच्या प्रकारामुळे जिल्ह्यातील प्रामाणिक शेतकऱ्यांना हकनाक त्रास होत आहे, असा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.