Solapur News : राज्य सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, तरीही सोलापूर जिल्ह्यात फक्त ५६ हजार शेतकऱ्यांनीच अर्ज भरल्याचे समोर आले आहे. गुरुवार (ता. १४) पर्यंत एकूण १,५७,८८७ शेतकऱ्यांकडून २,९९,१४६ अर्ज भरले गेले असून, हे आकडे गतवर्षाच्या तुलनेत तब्बल ५० टक्क्यांनी कमी आहेत. .गेल्या वर्षी खरीप हंगामात ७,३८,१८३ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला होता, तर यंदा ही संख्या कमी होऊन २,९९,१४६ वर आली आहे. संरक्षित क्षेत्रातही मोठी घट झाली असून ते ५,४४,८७१ हेक्टरवरून यंदा केवळ २,२६,३१४ हेक्टरवर आले आहे..Parbhani Crop Insurance : शेतकऱ्यांना ५२ कोटींचा पीकविमा मंजूर.योजनेतील बदल ठरले अडथळाराज्य सरकारने यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजनेत पाच महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यात नुकसानभरपाई केवळ काढणी पश्चातच देण्याचा निर्णय, संरक्षित पिकांच्या निश्चितीतील अचूकता नसणे, ऑनलाईन तक्रार प्रक्रियेस सक्तीचे न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी योजनेपासून दूर राहणे पसंत केले..Crop Insurance: वैयक्तिक नुकसान भरपाईचा ट्रीगर पीकविम्यातून काढला.सरकारसमोरील नवे आव्हानपीकविमा योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असली तरी अनुभव व अंमलबजावणीतून मिळालेली निराशा, विमा भरण्याचे प्रमाण घसरण्यास कारणीभूत ठरत आहे. योजनेतील तांत्रिक अडचणी, पारदर्शकतेचा अभाव, आणि नुकसान भरपाईच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. सरकारने त्वरित लक्ष देत, योजना सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली नाहीत, तर योजनेचा उद्देशच अपयशी ठरण्याची शक्यता आहे..तालुकानिहाय अर्जांचा आढावाबार्शी ८३,१६५अक्कलकोट ६०,९०३सांगोला २७,९२९करमाळा २७,८२६मंगळवेढा २७,२९५माढा २६,५५०दक्षिण सोलापूर १७,३०२उत्तर सोलापूर १४,२४२मोहोळ ९,२०५माळशिरस ३,८१६पंढरपूर ९१३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.