Agriculture Crisis: मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व विमाधारक व उर्वरित विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरसकट विमा देण्यात यावा. जर विमा कंपनीने शनिवार (ता. २५) पर्यंत खरिपाचा विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास महाराष्ट्रदिनी (ता. एक मे) राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे..तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर देखील उपोषण सुरू करण्यात येणार आहे, असेही आंदोलकांनी म्हटले आहे..Farmer Protest: बंधारा बांधण्यासाठी दानोळीत झाडावर चढून आंदोलन.प्रगती शेतकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष राजू साहेबराव वानखडे तसेच जनमंच, स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या पुढाकारात उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांना निवेदन दिले..Farmer Protest: ‘टेंभू’, ‘ताकारी’च्या पाण्यासाठी आंदोलन.निवेदनात म्हटले आहे, शासनाने आमच्या मागणीची दखल न घेतल्यास मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील सर्व विमाधारक शेतकरी ठिय्या आंदोलन करणार आहेत. निवेदनावर प्रगती शेतकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष श्री. वानखडे, नंदकिशोर बबानिया, सुरेश तिवारे, हरिभाऊ वानखडे, अनिल देवगीरकर, .जगदीश जोगळे, प्रफुल्ल मालधुरे, इरफान खान, गोपाल खंडारे, रमेश गोपकर, मनीष मुंदडा, विष्णुपंत चुडे, महेंद्र ठाकरे, अजय हांडे, संदीप ठाकरे, अनंत शेटे, गजानन गाडवे, रितेश लाहे, गोपाल मानकर, हरिनाम सिंह बाजहिरे, गिरधारी जाधव, मोहन मानकर, मुन्ना नाईकनवरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह इतरांना देण्यात आल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.