Sangli News : पंतप्रधान पीकविमा योजनेला १४ ऑगस्ट मुदतवाढ मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीकविमा घेण्यास पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील १ लाख २७ हजार २७६ शेतकऱ्यांनी पीकविमा घेत ६३ हजार ३५० हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केल्याची माहिती कृषी विभागाने दिली..जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलिताखाली आली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे खरीप हंगामातील विविध पिकांना विमाच्या संरक्षण दिले आहे. .Crop Insurance : बँकांनी १५ दिवसांत भरला १४०० जणांचा पीकविमा.नैसर्गिक स्थितीत शेतकऱ्यांसाठी पीकविमा महत्त्वाचा ठरतो आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी व्हावे यासाठी कृषी विभागाने प्रचार आणि प्रसिद्धीही केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी घेतला आहे..दरम्यान, पीकविमा भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. मात्र, शासन स्तरावर पीकविम्याची १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे पुन्हा शेतकरी विमा भरण्यासाठी पुढे आले. त्यामुळे पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख २७ हजार २६७ झाली असून ६३ हजार ३५० हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे. .Crop Damage Survey : नुकसानीचे २७ हजार ३०६ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण.गतवर्षीच्या खरीप हंगामात ३ लाख ६१ हजार ४३९ शेतकऱ्यांनी पीकविमा घेत १ लाख ७६ हजार ७०० हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले होते. वास्तविक यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा भरण्यास मुदत वाढ दिली असली तरी, गतवर्षीच्या तुलनेत पीकविमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ३४ हजार १७२ ने कमीच आहे..तालुकानिहाय पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्यातालुका शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टरमध्ये)आटपाडी १०,८६६ ६२९८.९३जत ७३,९५३ ४१,३५७.२०कडेगाव १०४० ३५५.७५कवठेमहांकाळ ८१८८ ३४४८.१३खानापूर ७०१५ २५८१मिरज ३४२२ १७७४.९९पलूस ७८४ ४२७.४४शिराळा ११०६ २५६.७८तासगाव १९,०२८ ६२४१.७७वाळवा १८८१ ६०७.९०एकूण १,२७,२६७ ६३,३५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.