Government Update: पीकविमा अर्ज भरताना केंद्राने पीककर्ज नसल्याचे हमीपत्र बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे हमीपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांत यावर निर्णय होईल. तसेच कोणत्याही शेतकऱ्याचा विमा अर्ज यामुळे रद्द होणार नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. .खरिपातील पीकविमा अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पण यंदा विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना शेवटी एक हमीपत्र द्यावे लागत आहे. ‘‘मी जाहीर करतो, की चालू हंगाम आणि वर्षासाठी संबंधित पीक आणि जमिनीच्या तुकड्यावर कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा सहकारी बँकेकडून कोणतेही किसान क्रेडिट कार्ड किंवा पीक कर्ज घेतलेले नाही..Kharif Crop Insurance Scheme: सुधारित खरीप पीकविमा योजना जाहीर -अर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत.नंतर असे आढळल्यास किंवा सिद्ध झाल्यास भारत सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंमलबजावणी करणारी विमा कंपनी माझा अर्ज नाकारण्यास, माझी पॉलिसी रद्द करण्यास किंवा कोणतेही लाभ रोखून धरण्यास पूर्णपणे पात्र असेल. तसेच यासंदर्भात मी कोणताही आक्षेप, तक्रार किंवा दावा करणार नाही,’’ असे हमीपत्र शेतकऱ्यांकडून घेतले जात आहे..शेतकऱ्यांमध्ये संभ्रमपीकविमा अर्ज भरताना यंदाच असे हमीपत्र घेतले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विमा अर्ज भरला आणि नंतर पीककर्ज घेतल्यास अर्ज रद्द होईल, या भीतीने शेतकरी विमा अर्ज भरण्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ४ लाख ८० हजार इतकेच विमा अर्ज शेतकऱ्यांनी भरले आहेत..कृषी विभागाचे केंद्राला पत्रशेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी हमीपत्राची अट काढून टाकावी, अशी विनंती करणारे पत्र राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पाठवले आहे. यासंदर्भातील नेमकी अडचण केंद्राच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे २ ते ३ दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे..Crop Insurance Scheme: हिंगोलीत पीकविमा योजनेत सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडदाचा समावेश.यंदा विमा गरजेचा :‘एल निनो’मुळे यंदा राज्यात पाऊस कमी आहे. सध्या अनेक भागात पावसाची नितांत गरज आहे. तसेच पुढील काळातही कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याचा परिणाम खरिपातील पिकांवर होत आहे. उत्पादनात घट येण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत पीकविम्याचे संरक्षण गरजेचे आहे. सरकारने महत्त्वाचे ट्रिगर लागू केले नसले तरी उत्पादकता आधारित भरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत विमा अर्ज भरून विमा संरक्षण घेणे गरजेचे आहे..अर्ज रद्द होणार नाही : कृषी विभागपीकविमा योजना देशभरात राबविली जाते. अनेक राज्यांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. बिगर कर्जदार शेतकरी कमी असतात. त्यामुळे केंद्राने हे हमीपत्र सर्वच राज्यांसाठी लागू केले. पण महाराष्ट्रात पीकविमा काढण्यात बिगर कर्जदार शेतकरी जास्त आहेत. त्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. पण शेतकऱ्यांनी काळजी करू नये. कोणत्याही शेतकऱ्याचा विमा अर्ज रद्द होणार नाही किंवा त्याचा लाभ रोखण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण कृषी विभागाकडून देण्यात आले आहे..हमीपत्र काढण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. पण शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. हमीपत्र दिले तरीही कोणत्याही शेतकऱ्याचा विमा अर्ज रद्द होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत होऊन विमा अर्ज भरावेत.- विनयकुमार आवटे, संचालक, कृषी विभाग, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.