Crop Inspection: राज्यात खासगी सहायकांमार्फत पीकपाहणी करताना ‘डीसीएस-एमएच’मध्ये सतत ‘फेस आयडी’ विचारला जात असून, प्रणाली बंद पडून पीकपाहणीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे फेस आयडीची अट तूर्त स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव जमाबंदी आयुक्तांनी राज्य शासनाला पाठविला आहे..केंद्र शासनाने विविध राज्यांमधील आधीची सदोष पीकपाहणी पद्धत निकालात काढली आहे. त्याऐवजी डीसीएस (डिजिटल क्रॉप सर्व्हे) भ्रमणध्वनी उपयोजन (मोबाइल अॅप्लिकेशन बेस्ड) आधारित पीकपाहणीची पद्धत देशभर लागू केली आहे. त्यामुळे राज्यात सध्या ‘डीसीएस-एमएच’ या मोबाइल अॅपद्वारे पीकपाहणी केली जात आहे. मात्र पीकपाहणी करताना सहायकांसाठी अलीकडेच ‘फेस आयडी’ची अट लावली गेली. ही अट नसताना सहायकांकडून एका दिवसात ५० प्लॉटची पाहणी केली जात होती. परंतु अट लागू होताच हेच प्रमाण ८-१० प्लॉटवर आले आहे. त्यामुळे सहायक हैराण झाले आहे. परिणामी, ही अट शिथिल करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे..Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना.दरम्यान, खासगी सहायकांमार्फत पीकपाहणी करण्यास ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा (तलाठी) विरोध अद्याप कायम आहे. सहायकाने केलेल्या पीकपाहणीच्या नोंदींची पडताळणी करण्यावर तलाठ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. यामुळे पीकपाहणी होणार नाही की नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे. या बाबत जमाबंदी आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘‘पीकपाहणीबाबत शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. .Kharif Crop Inspection: सहायकांच्या पीकपाहणीची १०० टक्के पडताळणी होणार; महसूल विभागाचे आदेश.कारण या समस्येवर प्रभावी उपाय आयुक्तालयाने शोधलेला आहे. त्यामुळे पीकपाहणीला उशीर होत असला, तरी त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तलाठ्यांशी देखील बोलणी चालू असून त्यांच्याकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत राज्यातील सहायकांनी १५ टक्के पीकपाहणी पूर्ण केली असून, ४५ लाखांहून अधिक ‘क्रॉप प्लॉट्स’ची नोंद घेतली आहे.’’.पीकपाहणीबाबत शेतकरी संभ्रमातपीकपाहणी चुकीची झाली की बरोबर झाली, हेच अद्याप शेतकऱ्यांना सांगण्यात आलेले नाही. पाहणी चुकीची असल्यास कोणाकडे दाद मागावी, असाही प्रश्न गावपातळीवर निर्माण झालेला आहे. कारण तलाठ्याने पीकपाहणीच्या नोंदींची पडताळणी केलेली नाही. पडताळणीनंतर ही नोंद चुकीची की बरोबर आहे हे कळणार आहे. नोंद चुकीची असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज करावा, असे शासनाने यापूर्वी सांगितलेले आहे. परंतु पीकपाहणी झालेली नोंद चुकीची की बरोबर, हे आम्हाला कोण सांगेल, असा सवाल शेतकरी करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.