Jalgaon News: पारोळा तालुक्यातील बहादरपूर मंडळात असलेल्या बहादरपूर, शिरसोदे, महाळपूर, विचखेडे, करंजी बुद्रुक, मोंढाळे, पिंपळ भैरव, पुनगाव, भोलाणे, वसंतनगर तांडा, जिराळी व इंधवे या गावांच्या सीमेलगत वनक्षेत्र आहे. परिणामी या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा संचार होत असल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. .म्हणून याबाबत वनविभागाने योग्य ती उपाययोजना करून शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान थांबवावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सोनवणे यांनी केली आहे..Wild Animal Crop Damage : जामलीमध्ये वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात.यापूर्वी बहादरपूर मंडळासह तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पन्न येईल, या आशेने गहू, मका, हरभरासह इतर पिकांची लागवड केली. मात्र, वन्यप्राण्यांमुळे वाढीस येणारे पीक पूर्णतः खुंटण्याची व पिकांचे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे..Wild Animal Crop Damage : पाडलोसमध्ये आंबा, काजू, नारळाचे गव्यांकडून नुकसान.वन्यप्राण्यांपासून खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाले होते. त्या वेळी शेतकऱ्यांनी पारोळा येथील वनविभाग, जिल्हा सहायक वनाधिकारी, पारोळा तहसीलदार, एरंडोल प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांना दिले होते. .परंतु, अजूनपर्यंत दखल घेतली गेली नाही. आता रब्बी हंगाम सुरू होऊन पेरण्या झाल्या आहेत. मात्र, रोज २०-२५ शेतातील पिकांचे नुकसान वन्यप्राणी करीत असल्याने प्रशासनाकडून अजूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.