Kolhapur News: दानोळी येथील वारणा नदीच्या काठावर तांबोळी वतातील परिसरात मोठी मगर रोज गवताच्या कुरणात येऊन पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी शेतकरी, मजूर व मेंढपाळांची नियमित वर्दळ असून, कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत..वारणा नदीच्या काठालगत असलेल्या गवताळ भागात ही मगर दिवसाढवळ्या उन्हात पडून राहते. नदीकिनारी असलेल्या शेतांमध्ये गवत कापण्यासाठी, जनावरांसाठी चारा गोळा करण्यासाठी करण्यासाठी शेतकऱ्यांना जावे लागते. अशा ठिकाणी मगर वारंवार दिसू लागल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे..Leopard Terror: बिबट्याच्या दहशतीने रस्ते निर्जन.गेल्या काही दिवसांपासून ही मगर या परिसरात ठाण मांडून आहे. नदीतून बाहेर येऊन गवताच्या कुरणात पडणे, पुन्हा संध्याकाळच्या सुमारास पाण्यात जाणे असा तिचा दिनक्रम झाला आहे. या भागात मेंढपाळांची मोठी वर्दळ असते..Crocodile Sighting : कृष्णा’नंतर आता कोयनेलाही ‘मगर’मिठी .शेतकरी गवत कापण्यासाठी नदीकाठावर जात असतात. अचानक मगर समोर आल्यास पळून जाण्याचा मार्ग नसल्याने जीविताला धोका पोहोचू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे..नागरिकांच्या सूचनामगर पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावी, नदीकाठावर सूचना फलक लावावेत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरता बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.