Dhule News: धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील हिरवळ दिवसेंदिवस आटत चालली आहे. काही वर्षांत वनक्षेत्र झपाट्याने घटल्याने पर्यावरणीय संतुलन धोक्यात येण्याचे चिन्ह आहे. अवैध वृक्षतोड, अतिक्रमण, गांजाची लागवड, वारंवार वनाग्निचे प्रकार आणि हवामानातील अनपेक्षित बदलासह अस्थिरता आदी अनेक घटकांनी या स्थितीला जबाबदार ठरवले आहे. वनसंपदेचे रक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जंगल टिकले तरच हरित भविष्य सुरक्षित राहील, असे वन विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले..अवैध वृक्षतोड रोखावीधुळे प्रादेशिक वन विभागाचे म्हणणे आहे, की अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमण रोखण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वनसंवर्धनासाठी लोकसहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नियमित गस्त आवश्यक आहे. संवर्धन मोहिमांद्वारे स्थानिक नागरिकांना जोडणे हेच विभागाचे प्रमुख ध्येय आहे. वनक्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या योजनांइतकाच लोकसहभाग निर्णायक ठरतो. त्यामुळे केवळ चिंता करत बसण्यापेक्षा कृतीशीलतेची चळवळ वृध्दींगत होण्याची गरज आहे..Tree Plantation: वृक्ष संगोपनाची अभिनव संकल्पना.अधिवास धोक्यातवनक्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या घटीमुळे बिबट्या, सांबर, नीलगाय, ससे यांसारख्या वन्यजीवांचा अधिवास कमी झाला आहे. अन्न, पाण्याच्या शोधात हे वन्यजीव आता गावांच्या हद्दीत शिरू लागले आहेत. वनतोडीमुळे केवळ जैवविविधतेचाच नव्हे, तर स्थानिक वातावरणाचाही तोल बिघडला आहे. तापमानात वाढ, पाण्याची टंचाई आणि मृदा धूप यांसारखे परिणाम ग्रामीण भागात प्रकर्षाने जाणवू लागले आहेत..हरित भविष्याची दिशावन विभागाचे अधिकारी सांगतात, की प्रशासनाचे धोरणात्मक पाठबळ मिळाले आहे, पण टिकाऊ परिणामासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अपरिहार्य आहे. वृक्ष लागवड, पाणलोट संवर्धन आणि जनजागृतीच्या माध्यमातूनच पुढील पाच वर्षांत हरित धुळे आणि नंदुरबार घडविता येईल. स्थानिक सहकार्य, सततची वृक्ष लागवड आणि पर्यावरणपूरक विचार अंगीकारला, तर ही हिरवाईची हाक केवळ घोषवाक्य न राहता वास्तवात उतरू शकते. धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या वनराईचे रक्षण ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने झाड लावणे, त्यांचे संगोपन करणे आणि अवैध वृक्षतोडीविरोधात भूमिका घेणे हीच हरित भविष्यासाठी खरी देशसेवा ठरेल..Tree Plantation : वाशीम जिल्ह्यामध्ये २.७९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट.आकडे सांगतात ऱ्हासाची सत्यता...इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२३ नुसार नंदुरबार जिल्ह्यात केवळ दोन वर्षांत ६५ चौकिमी जंगल कमी झाले आहे. या जिल्ह्याच्या पाच हजार ९५५ चौ.किमी क्षेत्रफळापैकी फक्त एक हजार ०४० चौ.किमी भागच आता वनक्षेत्राखाली उरला आहे. धुळे जिल्ह्याची स्थितीही फारशी वेगळी नाही. ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या नोंदीनुसार येथे केवळ १.४ हजार हेक्टर नैसर्गिक जंगल अस्तित्वात आहे. तेही औद्योगिक विस्तार, शेती आणि नागरीकरणाच्या दबावाखाली असल्याचे चित्र आहे..संवर्धनासाठी नवी मोहीमधुळे प्रादेशिक वन विभागाने अलीकडेच विविध संवर्धन उपक्रमांना गती दिली आहे. त्यामध्ये अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी विशेष पथके, तोरणमाळ इको-टुरिझम प्रकल्प, होमस्टे प्रशिक्षण योजना, अतिक्रमण हटविण्याची मोहीम, तसेच एक गाव- एक वन योजना, सामाजिक वनरोपण आणि जलसंधारण कार्यक्रम आदी विविध उपक्रमांचा समावेश आहे. अशा मोहिमेतून स्थानिक ग्रामस्थांना सहभागी करून वनसंवर्धनाची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.