Chhatrapati Sambhajinagar News: खादगाव (ता. पैठण) येथील शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंचासह चौघांविरुद्ध बुधवारी (ता.२४) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणाशी संबंधित महसूल अधिकाऱ्यांबाबतचा चौकशी अहवाल न आल्याने तूर्तास त्यांच्यावरील कारवाईला बगल देण्यात आली. .दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी महसुल मंत्र्यांच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने याप्रकरणी आपला अहवाल सादर केला आहे. मात्र प्रशासनामार्फत पोलिसांना कोणताच आदेश देण्यात न आल्याने या प्रकरणाशी संबंधित अधिकारी सोडून इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आहे. प्रशासनाच्या अहवालासह कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे..Farmer Death Investigation: आधी चौकशी, मग गुन्हे दाखल होणार !.खादगाव- खेर्डा रस्त्याच्या दुतर्फा नालीद्वारे पावसाचे पाणी शेतात येऊन नुकसान होत असल्याविरोधात शेतकरी संजय शेषराव कोहकडे यांनी तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात स्थळपाहणी करताना अधिकाऱ्यांकडून उलट शेतकऱ्यासच कारवाईची धमकी देण्यात आल्याने व्यथित कोहकडे यांनी १६ सप्टेंबर रोजी सर्वांसमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मात्र या गंभीर घटनेप्रकरणी मयत शेतकरी कोहकडे यांच्या नातेवाइकांना बालानगरच्या मंडळाधिकारी, तलाठ्यासह इतरांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी घटनेच्या दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन करावे लागले, परंतु प्रशासकीय हस्तक्षेपानंतर ती घेण्यात आली नाही..Farmer Issue: आत्महत्या, की व्यवस्थेचा बळी!.याप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्य चौकशी समिती नेमली. या समितीने तीन तास घटनेची चौकशी करून १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर केला. या अहवालात संबंधित अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती असून, जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अहवाल शासनास पाठविला आहे. परंतु आठ दिवस होऊनही यावर कार्यवाही झालेली नाही..दरम्यान, पोलिसांना कारवाईसाठी आदेश न मिळाल्याने मयत शेतकऱ्याची पत्नी वनिता संजय कोहकडे यांनी शासनाचा अहवाल येईपर्यंत सरपंच महेश बाबासाहेब डाके यांच्यासह अप्पासाहेब जगन्नाथ डाके, लक्ष्मण जगन्नाथ डाके, साईनाथ ज्ञानदेव डाके (सर्व राहणार खादगाव) यांच्याविरुद्ध पती, दीर व नातेवाईक यांना वारंवार शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व पतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून तक्रार दिली. या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला..यासंबंधी पाचोडचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित म्हणाले, ‘‘सदर घटनेचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे, शासनाकडून आदेश प्राप्त होताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.