Akola News: अकोला जिल्हा कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र बदलत्या हवामानामुळे, कीड-रोगांमुळे आणि बाजारातील चढउतारांमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहलेली आहेत..अशा परिस्थितीत निराशेच्या गर्तेत अडकलेल्यांना काहीसा दिलासा देण्याच्या उद्देशाने अकोला कृषी विज्ञान केंद्राने ज्ञान, तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या जोरावर एक नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कपाशीच्या विविध अवशेषांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती उभ्या राहू शकतात, असे या केव्हीकेने आपल्या दालनातून दाखवले आहे..Cotton Residue Management : कापूस पीक अवशेष व्यवस्थापनाचे तंत्र.केव्हीकेचे प्रमुख डॉ. उमेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सर्व तज्ज्ञांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. कापसाचे पीक काढल्यानंतर शेतात नख्या, वाळलेले झाड, पाने शिल्लक राहतात. बहुतांश वेळा हा सगळा अवशेष कचरा म्हणून जाळला जातो. मात्र या ‘कचऱ्या’कडे संधी म्हणून पाहता येऊ शकते. कापसाच्या नख्यांमधून कलात्मक वस्तू तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबवत त्यांनी शेतकरी, युवक आणि महिलांसमोर सृजनशीलतेचा नवा मार्ग उभा केला आहे..Residue Cotton Management: फरदड न घेता त्याऐवजी पऱ्हाटीची कुट्टी करा.कृषी विज्ञान केंद्राचा हा उपक्रम पर्यावरणपूरक तर आहेच, पण त्यातून पूरक उत्पन्नाच्या संधीही निर्माण होऊ शकतात. ग्रामीण भागातील महिलांना आणि युवकांना कौशल्य विकास, स्वयंपूर्णता आणि उद्यमशीलतेकडे नेणारा हा मार्ग ठरू शकतो, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला. कृषी प्रदर्शनात हे दालन लक्षवेधी ठरलेले आहे. विविध मान्यवरांनी भेटी देत कौतुक केले आहे..सुबक कलाकृतींची निर्मितीया उपक्रमातून कापसाच्या नख्यांपासून कमळ, फुलपाखरू, मधमाशी, खारुताई, हत्ती, बगळा, मोर, कासव, हरिण, घोडा, हंस, विविध पक्षी आणि भिंत-शोभेच्या आकर्षक वस्तू साकारण्यात आल्या आहेत. प्रत्येक कलाकृती अत्यंत सुबक, आखीव रेखीव तयार केली आहे. कचऱ्यातूनही सौंदर्य निर्माण होऊ शकते, असा संदेश या कलाकृती देतात. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.