Solapur News: इसबावी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अवैध वाळू साठवणूक व वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग प्रशांत डगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला..इसबावी येथील जि.प. शाळेजवळ, नगर परिषद स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस अवैध वाळू साठवून ती जेसीबीच्या सहाय्याने हायवा टिपरमध्ये भरून वाहतूक केली जात होती. छापा टाकण्यात आला असता घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने टिपरमध्ये सुमारे चार ब्रास वाळू भरली जात असल्याचे आढळून आले. .Illegal Sand Mining : अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीवर ‘एमपीडीए’अंतर्गत गुन्हे नोंदवा.या कारवाईत जेसीबी चालक पवन रामचंद्र बागल (रा. गादेगाव) व टिपर चालक सुहास मयाप्पा काळे (रा. बोहाळी, सध्या शिवाजीनगर, इसबावी) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच घरात लपून बसलेले आरोपी स्वप्नील मस्के (रा. गादेगाव), प्रकाश गंगथडे (रा. इसबावी) व शुभम यादव (रा. इसबावी) यांनाही पोलिसांनी पकडले..Illegal Sand Mining : अवैध वाळू वाहनांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी.आरोपींनी वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे दोन टिपर दाखवून दिले. चौकशीत हे टिपर चेतन धनवडे व नीलेश शिंदे (रा. इसबावी, ता. पंढरपूर) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यात तीन ब्रास वाळू आढळून आली..नितीन शिंदे यांच्या घराच्या आवारात वाळू वाहतुकीसाठी वापरलेला ४०७ टेम्पो, तसेच घटनास्थळावरून पळून गेलेली पांढऱ्या रंगाची महिंद्रा कार व अशोक लेलँड टेम्पो आढळून आले. या प्रकरणी सुहास काळे, पवन बागल, स्वप्नील मस्के, प्रकाश गंगथडे, शुभम यादव, नितीन शिंदे, नीलेश शिंदे, महेश शिंदे, दीपक काळे, नितीन पडळकर व चेतन धनवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.