Washim News: सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या रिसोड तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या दोन तक्रारींची चौकशी करीत कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैर अर्जदार अब्दुल रऊफ शेख चांद (रा. बाल समंदर, चांदनी चौक, रिसोड) आणि भगबान तुकाराम गुडधे (रा. नागझरी–गोंदाळा, ता. रिसोड) यांच्या राहत्या घरी सहकार विभाग व पोलिस विभागाच्या दोन पथकांमार्फत झडती घेण्यात आली..झडतीदरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे..Illegal Moneylending: राहू बेट परिसराला अवैध सावकारीचा विळखा.जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई पार पाडण्यात आली. .Illegal Moneylending India: अवैध सावकारीला आवर घाला.या कार्यवाहीमध्ये सहाय्यक निबंधक गजानन फाटे, सहाय्यक निबंधक आर. आर. सावंत, सहाय्यक निबंधक एम. डी. कच्छवे, सहाय्यक निबंधक आर. व्ही. आकुलवार यांच्यासह सिद्धार्थ पाटील, जे. एस. सहारे, .पी. आर. वाडेकर, आर. एन. शेख, एस. के. खान, के. व्ही. तलवारे, बी. ए. इंगळे, एस. बी. रोडगे, व्ही. बी. राठोड, आकाश बेले तसेच पोलिस विभाग व महसूल विभागातील कर्मचारी सहभागी होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.