CP Radhakrishnan oath नवी दिल्ली : सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा झाला..यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, व्यंकय्या नायडू आणि हमीद अन्सारी यांचीदेखील या सोहळ्याला उपस्थित होती. या सोहळ्यानंतर, राधाकृष्णन यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली..Vice President Election 2025 : सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीची मते फुटली.काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या शपथविधी सोहळ्यावेळी उपस्थित नव्हते. ते सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत..मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन विजयी झाले. त्यांना ४५२ मते मिळाली. तर विरोधी पक्षाचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. २१ जुलै रोजी जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदासाठी निवडणूक घेण्यात आली..Kokan University Convocation Ceremony: पदवीचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करा: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन .विरोधी गटातून क्रॉस-व्होटिंग?या निवडणुकीत एनडीएला ४२७ खासदारांचा पाठिंबा होता. तर वायएसआरसीपीच्या ११ खासदारांनीही राधाकृष्णन यांना पाठिंबा दर्शवला. दरम्यान, राधाकृष्णन यांना १४ मते अधिक मिळाली. यामुळे विरोधी गटातून क्रॉस-व्होटिंग झाल्याचे समजते..आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारदरम्यान, उपराष्ट्रपती निवडणूक जिंकल्यानंतर राधाकृष्णन यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. तर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे तूर्त महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे..राधाकृष्णन कोइम्बतूरचे दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी जनसंघातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी भाजपचे तामिळनाडूतील प्रमुख म्हणून काम केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.