Pune News: राज्यात गायीच्या दूध खरेदी दरात वाढ झाली आहे. आता शेतकऱ्यांना सरासरी प्रति लिटर ३८ रुपये खरेदी दर मिळू लागला आहे. दरात आणखी तेजी शक्य आहे, अशी माहिती डेअरी उद्योगातील सूत्रांनी दिली. .गाय दुधाच्या खरेदी दरात वाढ होण्याचा अंदाज ‘अॅग्रोवन’ने गेल्या महिन्यात दिला होता. महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सूत्रांनी सांगितले आहे की लोणी (बटर) व दूध भुकटी (मिल्क पावडर) बाजारात तेजी आहे. दूध भुकटीचा दर आता प्रति किलो १५ ते २० रुपयांनी वाढले आहे. भुकटीदर २७५ रुपयांपर्यंत गेला आहे. लोण्याचे दरदेखील प्रति किलो १५ रुपयांनी वाढले आहेत. लोणी आता ५०० वरून ५१५ रुपये झाले आहे. त्यामुळे या घडामोडींमुळे दूध खरेदीदर वाढत आहेत..Milk Price: दूध खरेदी दरात वाढीची शक्यता.यंदा मॉन्सून लांबला. त्यामुळे चारा नियोजनाला पोषक स्थिती होती. तसेच, दुभत्या जनावरांची संख्या कमी न करण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता. त्यामुळे दूध पुरवठा टिकून आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे डेअरी क्षेत्रातील उपपदार्थांचे प्रकल्प सध्या कच्च्या मालाच्या खरेदीला लागले आहेत. आइस्क्रीम उत्पादनाशी संबंधित नियोजनाला वेग आला आहे..यंदा मार्च, एप्रिल, मे अशी तीन महिने उपपदार्थांना चांगली मागणी राहील, अशी आशा वाटते आहे. यातून लोणी व भुकटीला मागणी वाढते आहे. ‘‘उन्हाळ्यामुळे दूध पुरवठा मर्यादित असेल. लोणी, दूध भुकटीचे दर भविष्यात आणखी सुधारू शकतात. तसे झाल्यास शेतकऱ्यांना खरेदीदर आणखी वाढवून मिळतील,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘अमूल’ तसेच ‘नंदिनी’सारख्या दूध प्रकल्पांनी स्थानिक दूध उद्योजकांसमोर उभे केलेले आव्हान आता काहीसे कमी झाले आहे..Milk Price: दूध खरेदी दर वाढेना!.परराज्यांतून होणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याइतपत व्यावसायिक तयारी स्थानिक प्रकल्पांनी केल्याचा दावा संघाने केला आहे. ‘‘स्पर्धात्मक वातावरणाचा अभ्यास स्थानिक प्रकल्पांनी केला. यातून आपापल्या स्तरावर योग्य ते बदल केले आहेत. त्यामुळे आता परप्रांतीय स्पर्धंकांची भीती वाटत नाही,’’ असे कल्याणकारी संघाच्या प्रवक्त्याने सांगितले..महिनाभरात राज्यात गाय दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर २ ते ३ रुपये वाढ झाली आहे. ही तेजी पुढे टिकून राहण्यास अनुकूल वाटणारी स्थिती सध्या तरी दिसते आहे.- प्रकाश कुतवळ, सचिव, महाराष्ट्र राज्य.दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ दूध भुकटी व लोणी बाजारात तेजी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गाय दुधासाठी आता सरासरी दर प्रति लिटर ३८ रुपये; तर म्हैस दुधासाठी ५६ रुपयांच्या पुढे मिळतो आहे. ही तेजी यापुढेही टिकून राहू शकते.- श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग समूह.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.