Ahilyanagar News: मृद्गंध देशी गोसंवर्धन केंद्राने गोमातेच्या संगोपनासोबतच जनजागृती, प्रशिक्षण आणि संशोधनात्मक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. गोपालन ही केवळ भावनिक बाब न राहता ती आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी चळवळ बनली पाहिजे. यासाठी शासनाच्या विविध योजना, अनुदाने व तांत्रिक मार्गदर्शन पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहे, असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले..शेवगाव तालुक्यातील भगूर येथील मृद्गंध देशी गोसंवर्धन केंद्रातील गोमाता नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पाटील, डॉ. श्यामसुंदर कौशिक, मंडलाधिकारी शीतल नागवडे, उपकृषी अधिकारी प्रकाश कांबळे, सुखदेव जमधडे, पशुधन विस्तार अधिकारी महेंद्र लाड, डॉ. चंद्रशेखर गवळी, संपत मुरदारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर जाधव, डॉ. सचिन बडधे, डॉ. माणिक लाखे, फुलचंद रोकडे, बाळासाहेब मुरदारे, नीलेश रोकडे, कैलास मुरदारे, कल्याणी मुरदारे, सुनील म्हस्के, राजेंद्र भवार उपस्थित होते..Desi Cow Conservation: देशी गोवंश संवर्धनाच्या राज्यपालांकडून सूचना .डॉ. पाटील म्हणाले, की गोमातेच्या संरक्षणासाठी, तिच्या आरोग्यासाठी व शास्त्रीय पद्धतीने संगोपनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या केंद्रातून शेतकऱ्यांना आधुनिक व पारंपरिक ज्ञानाचा संगम साधणारे गोपालनाचे मार्गदर्शन मिळेल..Cow Conservation: गवळाऊ गाय संवर्धन प्रकल्पास केंद्राकडून १६ कोटी.शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच गोसंवर्धनाची चळवळ यशस्वी होऊ शकते. गोमातेपासून मिळणारे शेण, गोमूत्र, पंचगव्य, सेंद्रिय खते, औषधी उत्पादने, अगरबत्ती आदी विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती शक्य आहे..या वेळी ऋतुराज मुरदारे, सुरेश मुरदारे, अनिल वावरे, संतोष काकडे, उद्धव मुरदारे, रेवणनाथ बर्डे, रावसाहेब मुरदारे, विनोद गाडगे, जितेंद्र भगत, चंद्रकांत कदम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेच्या प्रमुख कल्याणी मुरदारे यांनी केले. सूत्रसंचालन कांचन मुरदारे यांनी, तर कैलास मुरदारे यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.