Dharashiv News: यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरु राहिला. पर्यायाने रब्बीच्या पेरण्यांनाही उशीर झाला. यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी मोजणीसाठी दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये मोजणीसाठी मोठा उशीर झाला. यावर मात करण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख संग्राम जोगदंड यांच्या पुढाकाराने शनिवारी (ता. तीन) व रविवारी (ता. चार) सुट्टीच्या दिवशी विशेष मोजणी मोहीम हाती घेण्यात आली आहे..यात धाराशिव तालुक्यातील मोजणीच्या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार असून मोजणीनंतर लगेच हद्दी (खुणा) कायम करून शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे मोजणी नकाशा उपलब्ध करून देण्यात येणार आहे..Land Records: तुकडेबंदीच्या आदेशानुसार सातबाऱ्यावर नोंदी घ्या.विशेष मोहिमेत शनिवारी धाराशिव तालुक्यातील ५५ गावांतील ६५ प्रकरणांत मोजणी करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख जोगदंड यांनी सांगितले. या मोहिमेमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा जमीन मोजणीचा कामांवर परिणाम झाला. पाऊस उशिरापर्यंत सुरु राहिला व त्यानंतर रब्बीच्या पेरण्यांनाही कमालीचा उशीर झाला..शेतकरी रब्बीच्या पेरणीत व्यस्त राहिले. या व अन्य कारणांमुळे जमीन मोजणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिले. या प्ररणांचा जलद निपटारा करण्यासाठी तालुकानिहाय विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय जोगदंड यांनी घेतला. त्याला तालुक्यातील सर्व उपअधीक्षक भूमिअभिलेख व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बहुतांश अधिकारी व कर्मचारी शेतकरी कुटुंबांतील असल्याने सर्वांनीच उत्साहाने विशेष मोहिमेत सहभागी होणार असल्याचे सांगितले..Land Disputes: निपटारा होत नसल्याने जमीन मोजणीसाठी संघर्ष.जमाबंदी आयुक्त व संचालक सुहास दिवसे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपसंचालक किशोर जाधव यांनीही मोहिमेच्या नियोजनाचे कौतुक करून पाठबळ दिले. यामुळे सुट्टीचे दिवस असतानाही मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन दिवसात ११८ प्रकरणांचा निपटारा केला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत ५५ सर्वेअर सहभागी झाले आहेत. शनिवारी एकाच दिवशी धाराशिव तालुक्यातील ५५ गावांतील ६५ प्रकरणात मोजणी पूर्ण केल्याचे श्री. जोगदंड यांनी सांगितले..पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान सततचा पाऊस व जमिनीत चिखल असल्यामुळे मोजणीची कामे होऊ शकली नाहीत. धाराशिव तालुक्यात ७१० मोजणी प्रकरणे प्रलंबित राहिली असून त्यापैकी ५१० प्रकरणे मुदतबाह्य आहेत. मोहिमेत दोन दिवसात ११७ प्रकरणांची प्रत्यक्ष मोजणी होणार असून संबंधित जमीनधारकांना टपालाने नोटिसा पाठवल्या असून ई-चावडीवरही या नोटिसा प्रसिद्ध करण्यात आल्याचे जोगदंड यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.