Cotton Farming: योग्य कापूस वाणांची निवड महत्त्वाची
Cotton Variety Selection: गेल्या काही वर्षांत हवामानातील वाढती अनिश्चितता, गुलाबी बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव, उत्पादन खर्चातील वाढ आणि बदलते बाजारभाव या पार्श्वभूमीवर कापसाची वाण निवड अधिक महत्त्वाची आहे. योग्य वाणाची निवड केल्यास उत्पादन क्षमता वाढते, उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि हवामानाशी संबंधित जोखीम कमी करणे शक्य होते.