Akola News : दिवाळीच्या पर्वासह जिल्ह्यात सध्या सोयाबीन काढणी, रब्बी लागवड आणि आता कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत. सण असल्याने गावोगावी मजूर गावाबाहेर गेले आहेत. तर काहींनी सणानंतरच कामावर येण्याचे सांगितले आहे. परिणामी शेतांमध्ये आलेला कापूस झाडांवरच लटकलेला आहे..सोयाबीन हंगामाचा शेवट आणि रब्बी पिकांची पेरणी या दोन्ही कामांचा ताण सध्या शेतकऱ्यांवर आहे. त्यातच कापूस वेचणीचा काळ सुरू झाल्याने मजुरांची मागणी वाढली आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत मजूर उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत..Cotton Picking : पावसामुळे कापसाचा पहिला वेचा खराब.आठ-आठ दिवस शेतात न वेचलेला कापूस झाडांवर राहत असल्याने कोरडा पडून त्याच्या वजनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांत कापूस वेचणीसाठी प्रतिकिलो मजुरी पाच ते सात रुपये दिली जात होती. मात्र यावर्षी मजुरांची कमतरता भासल्याने मजुरी दर १० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. .तरीदेखील कामासाठी मजूर मिळत नाहीत. काही ठिकाणी शेतकऱ्यांना मजुरांच्या ये-जा खर्चासाठी वाहनभाडे वेगळे द्यावे लागत आहे. वेचणीला आलेला कापूस वेळेत न वेचल्यास नुकसान होते. त्यात दरही स्थिर नसल्याने दुहेरी फटका बसतो आहे. .Cotton Picking Wages: खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर.जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत हीच स्थिती असून, मजुरांची टंचाई ही समस्या सध्या शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनत चालली आहे. शेती मजुरांच्या टंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरी जात आहे..पावसाच्या अंदाजाने धडकी भरवलीकापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने तो शेतातच आहे. अशा स्थितीत सध्या वातावरणात बदल होऊन ढगाळ राहत आहे. पावसाचा अंदाज देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. हवामान खात्याने विदर्भात रविवार (ता.२६) पर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला. जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी मंगळवारी (ता.२१) काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या होत्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.