Soybean, Cotton Crop Loan: यंदाच्या २०२६-२०२७ या हंगामासाठी पीककर्जाचे नवे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. वाढत्या उत्पादनखर्चाचा विचार करता कर्जमर्यादेत दहा टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील केळी, हळद व कापूस उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे. सुधारित दरांमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी अधिकचे खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे. .बागायत कापसाला ६१ हजार १६० रुपये, सोयाबीनला ५९ हजार ४००, मका ४९ हजार ५०० व केळीला(टिश्यू कल्चर) एक लाख ८६ हजार ३४० रुपये कर्ज मिळणार आहे. जिल्ह्यातील मुख्य नगदी पिके असलेल्या कापूस व केळी उत्पादकांसाठी यंदा विशेष तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः टिश्यू कल्चर केळीसाठी आता एक लाख ८६ हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असल्याने बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे..नगदी पिकांसोबतच सोयाबीन व मका पिकांच्या कर्जमर्यादितही वाढ करण्यात आली आहे. सोयाबीनसाठी आता ५९ हजार ४०० रुपयांपर्यंत, तर बागायत मक्यासाठी ४९ हजार ५०० रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हळदीसारख्या मसाला पिकासाठी एक लाख ४८ हजार ५०० रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मसाला पिकांचा उत्पादनखर्च अधिक असल्याने ही वाढ फायदेशीर ठरणार आहे. वाढते मजुरीचे दर, खते व बियाणांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने कर्जदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे..Crop Loan Limit: यवतमाळ जिल्ह्यासाठी पीककर्ज मर्यादेत हेक्टरी वाढ.जिल्हा बँकेची प्रक्रिया सुरूउत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन आम्ही यंदाही कर्ज दरात दहा टक्के वाढ केली आहे. एक हजार २०० कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. जळगाव जिल्हा बँक १,२०० कोटींचे कर्जवाटप करणार आहे. एक एप्रिलपासून नवीन कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी यासाठी तातडीने कर्जाचे प्रस्ताव सादर करावे आहेत..Crop Loan Limit: पीककर्ज मर्यादेत १६ ते १६१ टक्क्यांपर्यंत वाढ.अडीच हजार कोटींचे उद्दिष्टजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांना मिळून यंदा दोन हजार ५०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे कर्ज पोहोचविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. साध्या केळीच्या बागा व टिश्यू कल्चर केळीच्या कर्जमर्यादेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ सुचविण्यात आली आहे. ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे जास्तीचे कर्ज उपयुक्त ठरेल..शेतकऱ्यांचा वाढता खर्च लक्षात घेऊन कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वेळेवर व पुरेसे भांडवल शेतकऱ्यांना बियाणे व खतांसाठी हातात राहील.- कुरबान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.