Poor Monsoon Impact: यावर्षीच्या (२०२६) खरीप हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यात गुरुवार (ता.१८) पर्यंत ११ हजार ९९० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात कपाशी ८ हजार ६७१ हेक्टर लागवड असून सोयाबीनची २ हजार ४२४ हेक्टर, तुरीची ६३० हेक्टर पेरणी झाली, असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..जूनच्या पहिल्या पंधरवड्यात तुलनेने अधिक पाऊस झालेल्या मंडलातील शेतकऱ्यांनी पुढेही पाऊस सुरुच राहील या अपेक्षेने पेरणी केली. विशेषतः कपाशीच्या लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. परंतु लागवडीनंतर पावसाने दडी मारली आहे. बियाण्याची उगवण व्यवस्थित होत नसल्यामुळे दुबार लागवड-पेरणीचे सावट आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी उगवलेली पिके जगविण्यासाठी पाणी देत आहेत. रखडलेल्या पेरण्यांसाठी दमदार पावसाची गरज आहे..Khandesh Cotton Sowing: कापूस लागवडीला खानदेशात वेग.परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ५ लाख २० हजार ८८५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गुरुवार (ता.१८) पर्यंत १० हजार ४२२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात कपाशीची ७ हजार ७६७ हेक्टरवर लागवड तर सोयाबीनची १ हजार ८८१ हेक्टर, तूर ५१७ हेक्टर, मूग १४९ हेक्टर, उडीद ७६ हेक्टर, ज्वारी १० हेक्टर पेरणी समावेश आहे. .Cotton Sowing: यंदा कापूस पेरा वाढण्याची शक्यता.हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ३ लाख ५३ हजार ६२३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गुरुवार (ता.१८) पर्यंत १ हजार ५६८ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात कपाशीची ९०४ हेक्टर लागवड आहे. सोयाबीन ५४३ हेक्टर, तूर ११३ हेक्टर, मूग २.२६ हेक्टर, उडीद २.७६ हेक्टर, ज्वारी पेरणी आहे..२०२५ मध्ये झाली होती १ लाख ९८ हजार हेक्टरवर पेरणी.....खरीप २०२५ मध्ये गुरुवार (ता. १९ जून) पर्यंत परभणी जिल्ह्यात १ लाख ५१ हजार ५६२ हेक्टरवर (२९.२३ टक्के) पेरणी झाली होती त्यात कपाशीची ७५ हजार ५४१ हेक्टर लागवड, सोयाबीन ६८ हजार ५६२ हेक्टर, तूर ५ हजार ३४९ हेक्टर, मूग १ हजार ३२० हेक्टर पेरणी होती. हिंगोली जिल्ह्यात ४६ हजार ५०५ हेक्टरवर (१४.३१ टक्के) पेरणी झाली होती. त्यात सोयाबीनची ३४ हजार १५८ हेक्टर पेरणी तर कपाशीची १० हजार हेक्टरवर लागवड झाली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.