Cotton Seed Sales from May 15: येत्या खरिपातील कापूस बियाणे विक्रीच्या वेळापत्रक मंजुरीची तीन महिन्यांपासून कथितरित्या ठेवलेली फाइल अखेर मंत्रालयातून बाहेर आली आहे. शेतकऱ्यांना येत्या १५ मेपासून बियाणे विकण्यास शासनाने मान्यता दिली आहे. .किरकोळ विक्रेते १५ मेपासून शेतकऱ्यांना कापूस बियाणे विकू शकतील. मात्र शेतकऱ्यांनी या बियाण्यांचा प्रत्यक्ष पेरा एक जूनपासून करावा, असे शासनाने म्हटले आहे. बियाणे विक्रीचे गोपनीय ठेवलेले यंदाचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे कापूस बियाणे उत्पादक कंपन्या, विक्रेते आणि शेतकरी वर्गाचा संभ्रम दूर झाला आहे..कृषी मंत्रालयाचे कक्ष अधिकारी सुहास सकपाळ यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना पाठविलेल्या पत्रात कापूस बियाणे उत्पादक कंपन्या १ मे ते १० मे या कालावधीत बियाणे विकावे. तसेच वितरकांनी दहा मेपासून किरकोळ विक्रेत्यांना बियाणे विक्री सुरू करावी, असे नमूद केले आहे..BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाणे भारतात महाग कसे? विजय जावंधिया यांचा पंतप्रधान मोदींना सवाल.दरम्यान, मंत्रालयातील लालफितीच्या गोंधळामुळे यंदा कापूस बियाणे बाजारात तयार झालेला संभ्रम एचटीबीटी लागवडीसाठी पोषक ठरल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. राज्यात २०१७ मध्ये कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर बियाणे विक्रीवर निर्बंध लावण्याची पद्धत कृषी विभागाने चालू केली..‘‘बाजारपेठेत कपाशीचे बियाणे वर्षभर उपलब्ध असल्यास शेतकरीदेखील कपाशीची लागवड हंगामपूर्व करतात. यातून बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होत नाही. त्यामुळेच बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो. रोगराई टाळण्यासाठीच आम्ही कपाशीच्या हंगामपूर्व लागवडीला दर वर्षी मनाई करतो,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे..हंगामपूर्व कपाशी लागवडी रोखण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना रोखू शकत नाही. त्यामुळे कपाशी बियाणे शेतकऱ्यांना हंगामपूर्व मिळू नये, अशी शक्कल लढवली जाते. त्यातूनच हंगामपूर्व बियाणे विक्रीवर बंदी आणली जाते. त्यासाठी महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री, विक्री किमतीचे निश्चितीकरण याचे विनियमन) कायदा २००९ चा आधार कृषी विभाग घेत असतो..BT Cotton Seed Variety: ‘नांदेड-४४’ बीटी कापूस वाणाची प्रात्यक्षिके राबविण्याची मागणी.एका बियाणे उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले, की या कायद्याचा आधार घेत कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दर वर्षी राज्यातील कापूस बियाणे विक्रीचे वेळापत्रक जाहीर करतात. या वेळापत्रकाचा भंग केल्यास कंपनी, वितरक किंवा किरकोळ विक्रेत्यावर कारवाईचा अधिकार गुणनियंत्रण निरीक्षकाला देण्यात आला आहे. मात्र यंदा वेळापत्रक जाहीर करण्यात दिरंगाई करीत शासनाने ‘वराती मागून घोडे’ असे कामकाज केले आहे..खरीप तोंडावर आलेला असतानाही बियाणे कंपन्या, बियाणे वितरकांना कृषी विभागाने बियाणे विक्रीच्या वेळापत्रकाविषयी वेळेत माहिती दिली नाही. या गोंधळात अर्ली कपाशीची लागवड करणारे शेतकरी क्षेत्रीय पातळीवरील विक्रेत्यांकडे बियाण्यांबाबत सतत विचारणा करीत होते. विक्रेत्यांच्या म्हणण्यांनुसार, या गोंधळाचा फायदा घेत राज्याच्या काही भागांत एचटीबीटी बियाण्यांची जोरदार विक्री झाली आहे. अर्ली लागवड करणारे कापूस उत्पादक शेतकरी आता बीटी की एचटीबीटी या चौकशीत न पडता सरळ मिळेल ते बियाणे ताब्यात घेत लागवडीचे नियोजन करतो आहे.....असे आहे कापूस बियाणे विक्रीचे नवे वेळापत्रकउत्पादक कंपनी ते वितरक १ ते १० मेवितरक ते किरकोळ विक्रेते १० मेनंतरकिरकोळ विक्रेते ते शेतकरी १५ मेपासूनशेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष लागवड १ जूनपासून.कापूस बियाणे विक्री वेळापत्रकाचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनाकडे पाठवला होता. आता प्रस्तावाला मान्यता मिळाली असून शेतकऱ्यांना मुबलक बियाणे वेळेत उपलब्ध होईल.सुनील बोरकर, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग.कापूस बियाणे विक्रीचे वेळापत्रक वेळेत जाहीर होण्यासाठी ‘माफदा’चा पाठपुरावा चालू होता. वेळापत्रकाअभावी संपूर्ण विक्री साखळी संभ्रमात होती. यातून एचटीबीटीच्या बियाणे विक्रीला अकारण चालना मिळाली. मात्र येत्या एक जूनपासून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होणार असल्याचे समाधान आहे.विनोद तराळ पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन (माफदा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.