Parbhani हमीभावाने कापूस विक्रीसाठी भारतीय कापूस महामंडळाच्या (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) परभणी व हिंगोली या जिल्ह्यांतील १४ पैकी १२ केंद्रांवर ३४ हजार १८५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी २ हजार ९३ शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाले आहे. जिंतूर, बोरी, हिंगोली येथील केंद्रांवर कापूस खरेदी सुरू झाली आहे, अशी माहिती राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली. .खरेदी हंगाम २०२५-२६ मध्ये सीसीआयच्या केंद्रांवर हमीभावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान मोबाइल ॲपद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागत आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, ताडकळस या १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत ३१ हजार ९०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १ हजार ९७८ शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाले आहे. .Cotton Procurement: कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने रोष.जिंतूर व बोरी केंद्रांवर शुक्रवारपासून (ता. ७) खरेदी सुरू झाली असून सोमवारपर्यंत (ता. १०) २५२.७० क्विंटल कापूस खरेदी झाली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, आखाडा बाळापूर, वसमत, जवळा बाजार या ४ बाजार समित्यांअंतर्गत २ हजार २८३ शेतकऱ्यांनी नोंंदणी केली असून त्यापैकी ११५ शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाले आहे. सोमवारी (ता. १०) हिंगोली येथील केंद्रावर २५ क्विंटल खरेदी झाली. प्रति क्विंटल ८०५० रुपये दर मिळाला..Cotton Procurement: शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा.कपास किसान ॲपद्वारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी जोडलेल्या चालू वर्षातील कपाशीचा पेरा असलेला ७-१२, आधारकार्ड आदी बाबींची पडताळणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून केली जात आहे. त्यानंतर सीसीआयकडून शेतकऱ्यांना मंजुरी (ॲप्रुव्हल) दिली जात आहे. कपास किसान ॲपद्वारे नोंदणी व स्लॉट बुकिंग प्रक्रियेस मदत करण्यासाठी https://www.youtube.com/@KapasKisan-Official ही विशेष लिंक तयार करण्यात आली आहे. स्लॉट बुकिंगची सुविधा ७ दिवसांसाठी खुली राहील. स्लॉट सुरू होण्याची वेळ दररोज सकाळी १० असेल..सीसीआय खरेदी केंद्रे, शेतकरी नोंदणी, कापूस खरेदी स्थितीखरेदी केंद्र शेतकरी नोंदणी शेतकरी प्रमाणिकरण कापूस खरेदी क्विंटलपरभणी ४००० २०० ००बोरी १०८५ १६० २४९.३०जिंतूर २१५८ ७५० ३६.४०सेलू ५५०० १० ००मानवत १५००० ८०० ००पाथरी १७३७ १८ ००.सोनपेठ ११५४ २० ००गंगाखेड १४०० ०० ००पालम ०० ०० ००ताडकळस ६७८ २० ००हिंगोली ८१० ४० २५आखाडा बाळापूर ३५० ५० ००जवळा बाजार ०० ०० ००वसमत ११२३ २५ ००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.