Farmer Relief: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) खरेदी थांबवल्यानंतर कापसाचे दर कोसळतील, अशी भीती शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये व्यक्त होत होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलट दिसून येत असून सध्या कापसाच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कापसाला सध्या प्रतिक्विंटल सुमारे ८,२०० रुपयांपर्यंत दर मिळत असून, काही दिवसांपूर्वी हा दर ८,२४० रुपयांपर्यंत गेला होता..यापूर्वी सीसीआयकडून चांगल्या प्रतीच्या कापसाची खरेदी सुमारे ८,०१० रुपये प्रतिक्विंटल दराने होत होती. मात्र खरेदीच्या शेवटच्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना स्लॉट न मिळाल्याने त्यांचा कापूस सीबीआयने खरेदी केला नाही. त्यामुळे खरेदी बंद झाल्यानंतर दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु सध्याच्या घडीला बाजारातील मागणी वाढल्याने कापूस दर हमीभावाच्या पुढे गेले आहेत. .Cotton Farmer Issue: कापूस वेचणी आणखी महागली.दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव असल्याचे जाणकारांचे मत आहे. आखाती भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सूत आणि वस्त्रोद्योगातील मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्याचा परिणाम कापूस दरांवर दिसून येत आहे. याशिवाय गाठी (कापूस बेल) व सरकीच्या दरातील तेजीही कापूस बाजाराला आधार देत आहे..राळेगाव बाजार समितीत सध्या दररोज २०० ते २५० वाहनांमधून कापूस विक्रीसाठी येत असून, अंदाजे ७ ते ८ हजार क्विंटल कापसाची उलाढाल होत आहे. यामध्ये सुमारे ७० टक्के कापूस हा मागील हंगामातील (जुना) असून उर्वरित ३० टक्के नवीन आवक आहे. एप्रिल महिनाभर ही स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. .Cotton Prices: खुल्या बाजारातील कापूसदरात सुधारणा.चालू हंगामात राळेगाव बाजार समितीमार्फत एकूण ८ लाख ७६ हजार क्विंटल कापसाची विक्री झाली आहे. यापैकी ३ लाख १२ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला, तर उर्वरित ५ लाख ६४ हजार क्विंटल कापूस खाजगी व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आला. सध्या अजूनही सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचा कापूस शिल्लक असल्याचे वृत्त आहे..शेतकऱ्यांना दिलासासीसीआय खरेदी थांबल्यानंतरही बाजारातील मागणी, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि उपउत्पादनातील तेजी यामुळे कापूस दराला आधार मिळत असून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.