Pune News: हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआयने खेरदी केंद्रे सुरु केली. पण या केंद्रांवर नगण्य कापूस खरेदी होत आहे. कारण १२ टक्क्यांच्या आत ओलावा असलेला कापूस मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना इच्छा नसतानाही खुल्या बाजारात कमी भावात कापूस विकावा लागत आहे. त्यामुळे सीसीआयने कापूस ओलाव्याची अट शिथिल करून २० टक्क्यांपर्यंत करावी, अशी मागणी सर्वच कापूस उत्पादक राज्यांनी केली..बाजारात सध्या कापसाचा भाव हमीभावापेक्षा किमान १३०० ते १५०० रुपयाने कमी आहे. कापसाचा हमीभाव लांब धाग्याच्या कापसासाठी ८ हजार ११० रुपये आहे. तर मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ७१० रुपये हमीभाव आहे. मात्र खुल्या बाजारात कापसाला ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये भाव आहे. कापसाची वेचनी होत आहे तसे बाजारात कापसाची आवकही वाढत आहे. .CCI Cotton Procurement : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस ओलाव्याची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवा; तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र.सीसीआयने सर्व कापूस उत्पादक राज्यांमध्ये हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केली. देशभरात ५५० केंद्रे सुरु करण्याचे उद्दीष्ट होते. त्यापैकी महाराष्ट्रात १५० केंद्रे सुरु होत आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये १५ ऑक्टोबरपासून केंद्रे सुरु व्हायला सुरुवात झाली. तर तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात २१ ऑक्टोबरपासून खरेदी सुरु झाली. खरेदी केंद्रे सुरु झाली मात्र ओलावा अधिक असल्याने खेरदी कमी होत आहे. .Cotton Damage : सप्टेंबरमध्ये तीन जिल्ह्यांत कपाशीचे ६ लाख ४६ हजार हेक्टरवर नुकसान.पेरणीसाठी कापसाची विक्रीपेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मात्र, कापसात ओलावा अधिक असल्याने सीसीआय कापूस खरेदी करत नाही. हा कापूस शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावात विकावा लागत आहे. पेरणीसाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी नाईलाजाने माल विकत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. .तेलंगणाचे केंद्राला पत्रतेलंगणाचे कृषिमंत्री तुम्माला नागेश्वरा राव यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराजसिंह यांना पत्र लिहून कापूस खरेदीतील ओलाव्याची अट १२ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर वाढविण्याची मागणी केली. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी आहेत. तसेच कापसाचा ओलावा अधिक आहे. १२ टक्के ओलाव्याचा कापूस सध्याच्या वातावरण मिळणे कठीण आहे. त्यामुळे कापूस ओलाव्याची अट १२ टक्क्यांवरून २० टक्के करावी. असे केले तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे राव यांनी म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.