Nashik News : खरीप हंगाम अंतिम टप्प्यांत असताना कापूस, मका, बाजरी हे पिके काढणीला होती. खरीप कांदा लागवड आटोपली आहे. तर द्राक्षपट्ट्यात कामांना वेग आला होता. अशातच अतिवृष्टी व अनेक भागात मुसळधारेने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे अस्मानीच्या तडाख्यात जवळपास ३४ हून अधिक गावात १९ हजार शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे..गेल्या महिन्यात अतिवृष्टीने मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी बाधित झाले होते. त्यातच सोमवार(ता. २२) रोजी सायंकाळनंतर झालेल्या पावसाने झोडपल्यानंतर पुन्हा पावसाने झोडपले. अतिवृष्टी झालेल्या भागात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून पिकांचे नुकसान दिसून येत आहे. त्यामुळे सणासुदीला दोन पैसे पदरी पडण्याची आशा काही ठिकाणी मावळली आहे. त्यामुळे शेतकरी या संकटामुळे तणावात आहेत..पूर्व भागातील गावामध्ये आगाप कापूस लागवड असते. अनेक ठिकाणी कापूस वेचणीला आला होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सततचा पाऊस असल्याने कापूस भिजून काळा पडला आहे.तर बोंडांच्या सरकीतून कोंब निघू लागले आहे. शेंदुर्णी, नाळे, दहिवाळ, गुगुळवाड, साजवहाळ, पळसदरी, झोडगे, अस्ताने, कंधाने परिसरात सर्वाधिक नुकसान आहे. .Crop Damage: पावसाने पावणेदोन लाख हेक्टरला बाधा.या भागात खरीप कांदा लागवडी देखील झाल्या होत्या मात्र त्या पाण्याखाली केल्याने उत्पादन मिळण्याची अपेक्षा सुद्धा राहिली नाही असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच मंगळवारी उघडीप दिल्यानंतर बुधवारी(ता. २४) रोजी काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता अजून वाढली आहे..द्राक्ष उत्पादक अडचणीतगिरणा धरणाच्या परिसरात द्राक्षबागा आहेत. मात्र जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी बागांमध्ये पाणी साचल्याने ऐन हंगामात द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसामुळे बागांमध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे एकीकडे पीक संरक्षण खर्च वाढला असताना दुसरीकडे बागांमध्ये चिखल व पाणी असल्याने फवारणीसाठी ट्रॅक्टर ही चालत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे..Crop Damage: पावसाने पावणेदोन लाख हेक्टरला बाधा.मथुरपाडे येसगाव या परिसरात ही अडचण मोठी आहे.आगाप छाटण्या झालेल्या भागांमध्ये मनी तयार होण्याच्या अवस्थेत डाऊनीचा प्रादुर्भाव तर पोंगा अवस्थेतील भागांमध्ये घड जिरण्याची समस्या समोर येत आहे. पीक संरक्षण करताना एकीकडे खर्च तर दुसऱ्याकडे ट्रॅक्टर चालत नसल्याने फवारण्यांसाठी नळ्या पसरून बागा वाचवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यातच वेली पिवळ्या पडत अन्नग्रहण क्षमता पाणी साचल्याने मंदावली आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक दीपक शिंदे यांनी दिली..पावसामुळे पिके अनेक ठिकाणी पाण्यात तर काही पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे हाताशी काही लागणार नाही. थोड्याफार उत्पन्नाची आशा होती आता ती ही मावळली. घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि कर्जमाफी सुद्धा जाहीर करावी. तरच शेतकरी उभा राहील अन्यथा आता अवघड आहे.– नाना पगार शेतकरी पाडळदे, ता. मालेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.