Beed News: शासकीय कापूस खरेदी केंद्रावर खासगी खरेदी केंद्रांच्या मानाने अधिक चांगला दर मिळत असल्याने सीसीआयकडे कापूस उत्पादकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र नोंदणी, अप्रुव्हल आणि इतर जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना बाजार समिती कार्यालय तसेच जिनिंगवर वारंवार चकरा मारण्याची वेळ आली असून त्यामुळे त्रास वाढला आहे..यंदा खरीप हंगामात तीस हजारांवर कापसाची लागवड झाली होती. लागवड उशिरा झाल्यानंतर पुन्हा सतत झालेल्या पावसामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी महागडी खते, औषधे फवारून कापूस जोपासला. परंतु अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे कापसाचे नुकसान झाले. अवघ्या दोनच वेचणीत झाडांवरचा कापूस संपला..Cotton Harvest: कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई.सध्या रब्बी पेरणी सुरू असल्याने शेतकरी कापूस विक्रीला प्राधान्य देत आहेत. शासनाने प्रारंभीच शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली, परंतु त्यामध्ये घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची गैरसोय वाढली आहे. मागील वर्षी हेक्टरी तीस क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली होती; मात्र यंदा हेक्टरी केवळ तेरा क्विंटल खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली असून ती रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. त्याचबरोबर ‘कपास किसान’ अॅपवर सीसीआयला कापूस विक्रीसाठी नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीनंतर बाजार समिती कार्यालयाचे अप्रुव्हल, त्यानंतर स्लॉट बुकिंग अशा संपूर्ण जाचक प्रक्रियेने शेतकरी हैराण झाला आहे..आकडे बोलतात...खासगी खरेदी केंद्रे : सहाखरेदी केलेला कापूस : सव्वीस हजार क्विंटलखरेदी सुरू झाल्याची तारीख : २७ ऑक्टोबरमिळणारा दर : सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल.Soybean Price: सोयाबीन दर स्थिर; तसेच काय आहेत कापूस, टोमॅटो, शेपू आणि मटारचे आजचे बाजारभाव .सीसीआय खरेदी केंद्रे : सहाखरेदी केलेला कापूस : पंचवीस हजार क्विंटलखरेदी सुरू झाल्याची तारीख : १० नोव्हेंबरमिळणारा दर : सात हजार सातशे ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटलएकूण कापूस खरेदी : ५१ हजार क्विंटल.कापूस विक्री अथवा नोंदणीसंबंधी काही अडचण असल्यास बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.- श्रीहरी मोरे, उपसभापती, बाजार समिती, माजलगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.